MH 13News Network
आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सरासरी ५४.८५ टक्के मतदान झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे –
रामटेक ५२.३८ टक्के
नागपूर ४७.९१ टक्के
भंडारा- गोंदिया ५६.८७ टक्के
गडचिरोली- चिमूर ६४.९५ टक्के
आणि चंद्रपूर ५५.११ टक्के आहे.