चिंचोली एमआयडीसी येथील आयएमसी सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा..! प्रशासनाचे दुर्लक्ष..?
सोलापूर शहर परिसरामध्ये सीएनजी पंपावर नेहमीच वाहनधारकांच्या रांगा असतात. सुरळीत आणि नियमितपणे सीएनजी गॅस मिळत नसल्यामुळे अशी अडचण निर्माण होत असल्याची ओरड असते. हायवे वरून जाणारे आणि सोलापुरातील स्थानिक वाहने एमआयडीसी चिंचोली येथील आयएमसी सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी येत असतात. मात्र येथील कंपनी प्रशासनाने फिटेड आणि कंपनी अनफिटेड गाड्या एकाच रांगेतून सोडण्याचा स्वतःच्या मर्जीने निर्णय घेतल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगांच्या रांगा लागत आहेत. यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज शनिवारी भर दुपारी सुद्धा अनेक वाहने सीएनजी गॅस भरण्यासाठी रांगेत उभी होती.यामध्ये कंपनी फिटेड आणि कंपनी अनफिटेड सीएनजी वाहनधारकांमध्ये रांगे मधून येण्यामुळे मनस्ताप होत होता. याला कारण म्हणजे दोन्ही प्रकारच्या वाहनांसाठी एकच रांग असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे होते.
फक्त कॅश पेमेंट स्वीकारले जाईल..!

केंद्र आणि राज्य सरकारने डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून अधिकाधिक व्यवहार होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र आय एम सी च्या सीएनजी पंपावर फक्त कॅश पेमेंट स्वीकारले जाईल असा एक साधा बोर्ड लावल्याने ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या वाहनधारकांना मोठा मनस्ताप स्वीकारावा लागत आहे. आय एम सी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करून येथील पंपाला शिस्त लावावी अशी मागणी वाहनधारकांमधून जोर धरत आहे.

येथील पंपाच्या प्रशासनाशी चर्चा केली असता त्यांनी कोणता नियम आम्हाला माहित नाही. असे बोलून उडवाडवीची उत्तरे दिली.येथील इन्चार्ज विशाल चतुर यांच्याशी यासंदर्भात प्रतिक्रिया घेतली असता मॅनेजर शशी चौगुले हे सध्या परगावी असल्याने ते उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे.
