MH 13 News Network
माजी दुग्धविकास मंत्री कै.आनंदराव देवकते यांच्या स्मृतीस महादेव कोगनुरे यांनी दिला उजाळा
महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्धविकास मंत्री व सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून समाजकार्य करणारे सहकार चळवळीतील नेते म्हणून परिचित असणारे कै.आनंदराव देवकते यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राजूर तालुका दक्षिण सोलापूर येथे एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांनी कै.आनंदराव देवकते यांच्या स्मृतिस उजाळा देत प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
यावेळी माजी सभापती अशोक देवकते, राधाकृष्ण पाटील, अप्पाशा मंदोली, राहुल देवकते, माजी जि प सदस्य आप्पासाहेब काळे,राजुर गावचे उपसरपंच सतीश देवकते, औराद चे नामदेव बंडगर, संजवाडचे माजी सरपंच अमोगसिद्ध बोलगुंडे, बनसोडे सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकारणातील एक प्रामाणिक कार्य करणारे आदर्श नेतृत्व..!
कैलासवासी आनंदराव देवकते यांचे दक्षिण सोलापूर साठी खूप मोलाचे योगदान ठरले आहे. अजूनही ग्रामस्थांच्या मनात त्यांच्या विषयीच्या भावना आणि आदर कायम आहेत. राजकारणातील एक प्रामाणिक कार्य करणारे आदर्श नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे समाज पाहतो. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृती चिन्हावर मार्गक्रमण करणे हीच खरी आदरांजली ठरेल. अशी भावना दक्षिण मतदार संघातील काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांनी यावेळी व्यक्त केली.