Tuesday, August 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मार्केटयार्ड चौक होणार ॲक्सीडेंट फ्री ; उड्डाणपुलासाठी फडणवीस, गडकरी यांचे मालकांना सहकार्य

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
310
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

उड्डाण पुलाच्या कामाचा आ. विजयकुमार देशमुख यांनी पाहणी करून घेतला आढावा

कृषी उत्पन्न बाजार समितीचा चौक होणार अपघातमुक्त : १८ महिन्यांत काम होणार पूर्ण

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील चौक आता लवकरच अपघात मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.   बाजार समिती समोर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून घेतला.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर २ किमीचा उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ५० कोटी रुपयांचा निधी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मिळवला आहे. त्याचा कार्यारंभ आदेशदेखील प्राप्त झाला असून लवकरच या कामात सुरुवात होणार आहे. त्याची पाहणी आ. देशमुख यांनी सोमवारी केली.

माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख म्हणाले,

पुणे, हैदराबाद आणि विजयपूर येथून येणारी जड वाहने या चौकात एकत्र येतात. तसेच शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे भाजी, फळे, धान्यांची वाहतूक सतत सुरू असते. शेळगी, विडी घरकुल यांसारख्या मोठी नागरी वस्ती असलेल्या परिसराकडे जाण्यासाठी नागरिकांना या चौकातून जावे लागत असल्यामुळे या चौकात सातत्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो. परिणामी, दुर्दैवाने या चौकात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे येथून उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. निधी मिळून कार्यारंभ आदेश मिळाल्यामुळे या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे.

याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ. किरण देशमुख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपाभियंता महेश येमूल, अनिल विपत, माजी सभागृह नेते संजय कोळी, श्रीशैल अंबारे, महालिंगप्पा परमशेट्टी, सुरेश हत्ती, एन. डी. जावळे, अमोल बिराजदार, बाळू पटेल, बसवराज इटकळे, शिवानंद पुजारी, हरीकांत सरवदे, ज्ञानेश्वर कारभारी, शंकर शिंदे, विरेश उंबरजे, सोमनाथ रगबले, राहुल शाबादे, विनायक बंग, धरीराज रमणशेट्टी, वैभव बरबडे, प्रविण कांबळे, संतोष मोकाशे, मल्लू कोळी, आनंद साळुंखे, नागेश रामपुरे, गणेश कोळी, गुड्डू निर्मळ, बाळू राऊत, रवी कोसगी, प्रशांत गायकवाड, राहुल घोडके, प्रकाश जाधव, महादेव जातकर, नागेश उंबरजे, आशिष दुलंगे आदी उपस्थित होते.
——–


उड्डाण पुलाबाबत शनिवारी बैठक

सोलापूर शहरातील दोन उड्डाण पुलाबाबत येत्या शनिवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार आहे. दोन्ही उड्डाणपूलांचे काम लवकरात लवकर सुरू करुन लवकर पूर्ण व्हावे याबाबत चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
——–

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समोरील २ किमी लांबीच्या उड्डाणपुलासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि शेळगीला जाण्यासाठी सर्व्हिस रोड करण्यात येणार आहे.
—- अनिल विपत, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

वारंवार होणाऱ्या जीवघेण्या रस्ते अपघात आणि वाहतूक खोळंब्यावर उपाय म्हणून माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी उड्डाणपूलासाठी निधी मंजूर करवून घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.
—- नागेश उंबरजे, नागरिक

Tags: BJP MaharashtraDevendra fadanvisnitin gadkari
Previous Post

जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात

Next Post

पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.