MH 13 News Network
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविजय मिळवला असून भाजपमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आहे. सोलापूर शहर मध्य आणि उत्तर मध्ये विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे अनंत जाधव यांनी नुकतीच काळजीवाहू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील तसेच भाजप नेते रावसाहेब दानवे उपस्थित होते. राज्याच्या राजकारणातील बाप माणसाची भेट माझ्यासाठी स्फूर्तीदायी असल्याची भावना अनंत (नेता)जाधव यांनी व्यक्त केली.
अनंत जाधव हे मराठा समाजातील शहरातील राजकारणामधील दिग्गज नेता मानले जातात. शहर उत्तर मधील आमदार विजयकुमार देशमुख, मध्य मधील युवा आमदार देवेंद्र कोठे यांच्या विजयामध्ये उत्तम संघटन कौशल्य असणारे जाधव यांचा सिंहाचा वाटा होता.
विधानसभेतील महा विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्याचे जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेऊन शहरातील राजकारणाविषयी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नरेंद्र पाटील,भाजप नेते रावसाहेब दानवे आदी मान्यवर सोबत होते.
माझे मार्गदर्शक, देवेंद्र फडणवीस यांना मी राज्याच्या राजकारणातील बाप माणूस समजतो. विधानसभेच्या विजयामध्ये फडणवीस हे हुकमी एक्का होते. त्यांची भेट माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी स्फूर्तीदायी आहे. मुंबईतील सागर बंगल्यावर त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सुद्धा पाठीवर हात ठेवून मला ऊर्जा दिली.
अनंत जाधव, भाजप नेता