MH 13 News Network
खासदार संजय (भाऊ) दिना पाटील यांचा राजू हौशेट्टी मित्र परिवाराच्या वतीने सत्कार
ईशान्य मुंबईचे खासदार संजय (भाऊ)दिना पाटील यांची गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार समिती (भारत सरकार) च्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल तसेच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजू हौशेट्टी मित्रपरिवारच्या वतीने मुलुंड मुंबई येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात शाल पुष्पगुच्छ व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

सोलापूरशी माझे जवळचे नाते..

सत्काराला उत्तर देताना खासदार संजय पाटील यांनी आपल्या सर्वांचे प्रेम असेच माझ्यावर सदैव राहो ही इच्छा व्यक्त केली. सोलापूरशी माझे जवळचे नाते आहे, श्री सिद्धरामेश्वराच्या पुण्यनगरीतून आपल्या माध्यमातून होणारा सत्कार हे माझ्यासाठी आनंदाचे आहे.सोलापूरहून येऊन शुभेच्छा आणि सन्मान केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार असल्याचं त्यांनी सांगितलं.
या प्रसंगी राजोल (ताई) संजय पाटील, सुनील पवार ,मामा मंचेकर, वाल्मीक माने, सुहास वाकोडे, सुनील आंगणे ,किरण चव्हाण ,सागर दादा, प्रकाश जाधव ,भाई पाटील, वैभव हाडगे तसेच मतदार संघातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.