सोलापूर, दि. २ एप्रिल
(शहर प्रतिनिधी) :- येथील नू.म.वि. शिशु शाळेतील शिक्षिकांसाठी वृत्तलेखन या विषयावर कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार दत्तात्रय आराध्ये, पत्रकार विक्रांत कालेकर आणि मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी उपस्थित होत्या. या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळेस २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश अर्ज वितरणाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
उद्घाटन कार्यक्रमानंतर अरविंद जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनात बातमीतील पाच डब्ल्यू आणि एक एच म्हणजे काय, त्यांचे महत्व समजावून सांगत बातमी कशी लिहावी याबाबत सांगितले. तसेच आपल्या लिखाणामध्ये शुद्धलेखन महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी शिक्षिकांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही अरविंद जोशी यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना कुलकर्णी यांनी केले. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कांचन कुलकर्णी यांनी सूत्र संचालन केले. कार्यशाळेत शाळेतील सर्व शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.सोलापूरच्या नू.म.वि. शिशूशाळेत शिक्षिकांसाठी वृत्तलेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, पत्रकार दत्तात्रय आराध्ये, मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी आदी उपस्थित होते.
