लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारी वाढत जात असून आज वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात भाजप विरोधात तक्रार दाखल केली आहे.आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर फोटोंवर कार्यवाही शासकीय यंत्रणाकडून केली जाते. मात्र, सध्याचे चित्र बदलले असून भाजपचे नेते मोदींचा फोटो लावून अमरावती विभागीय आयुक्त यांच्या वेबसाईटद्वारे भाजपचा प्रचार करीत असल्याचे दिसून आले आहे. अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत फेसबुक पेजवर व्यक्त करण्यात आली आहे.यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी वंचितच्यावतीने तक्रार दाखल केली आहे. तसेच, तातडीने वेबसाईटवरील फोटो काढण्याची मागणी केली आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे.