Wednesday, December 3, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बातमीचा दणका : आमदारांचा हस्तक्षेप, प्रशासनाची मक्तेदाराला नोटीस ; कामास लागला ‘ मुहूर्त ‘

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
409
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

उत्तर सोलापुरातील बाळेभागातील राजेश्वरी नगर येथील पाईपलाईनचे काम रखडल्याची बातमी प्रकाशित झाल्यानंतर आमदारांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर महापालिका प्रशासनाने मक्तेदाराला नोटीस दिली आणि तातडीने कामास मुहूर्त लागला.

त्याचे झाले असे की…

उत्तर सोलापुरातील बाळे भाग हा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथील अनेक नगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर देशमुख यांनी विकास निधी खर्च केला आहे. परंतु राजेश्वरी नगर भागात गेल्या दहा वर्षापासून रस्ता तसेच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करण्यात आली नव्हती. स्थानिक नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात या नगरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाईप लाईन,नवीन रस्ते बांधणी, बोअरवेल, पेव्हर ब्लॉक , वृक्षारोपण असे कोणतेही काम केलेले नव्हते.यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे.

राजेश्वरी नगर

लोकसभा निवडणुकीच्या आधी आमदार विजयकुमार देशमुख यांनी या ठिकाणी लोखंडी पाईपलाईनसाठी साडेबारा लाख रुपयांचा निधी दिला. रस्ता मंजूर करण्याबद्दल येथील स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांची चर्चाही झाली होती. परंतु तरीही या ठिकाणी कोणतेही काम करण्यात आले नाही.
एम एच 13 न्यूजने या नगराच्या असुविधेबाबत बातम्या प्रकाशित केल्यानंतर आमदार देशमुख यांनी प्रशासनासोबत स्वतः येण्याचे आश्वासन दिले होते. याच दरम्यान पावसाळी अधिवेशन आल्यामुळे काम पुन्हा रखडले.
बातमीचा फॉलोअप घेतल्यानंतर आमदार देशमुख यांनी या भागातील त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते राजाभाऊ आलूरे, आनंद भवर यांना सूचना केल्या.

दरम्यान, आमदारांच्या हस्तक्षेपानंतर महापालिका प्रशासनाने पाईपलाईनचे काम करणाऱ्या मक्तेदाराला तातडीने नोटीस बजावली. आमदाराच्या विकास कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदारांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सज्जड इशारा दिल्याचे समजते.त्यानंतर खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटिसीमुळे मक्तेदार यांनी तातडीने पाईपलाईनचे काम सुरू केले आहे.



आज बुधवारी दुपारी राजेश्वरी नगर येथील पाईपलाईनचे काम सुरू केल्याचे आढळून आले. नगरातील रहिवाशांनी याबद्दल समाधान व्यक्त केले असून रस्त्याचे आणि स्वच्छतेचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे.

या ठिकाणी रस्त्याचे काम केलेले नसल्यामुळे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल पसरतो. याच परिसरातील नागरिक, वाहनधारक मोठ्या प्रमाणावर घसरून पडले आहेत. पाईपलाईन नंतर रस्त्याचे काम तातडीने करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Tags: BJP MaharashtraMLA vijaykumar deshmukh
Previous Post

Video : शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे विरोधात खंडणी व मारहाणीचा गुन्हा .!

Next Post

ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी – पोलीस आयुक्त एम. राजकुमार

Related Posts

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..
गुन्हेगारी जगात

अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..

29 November 2025
शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण
सामाजिक

शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण

27 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
Next Post

ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी - पोलीस आयुक्त एम. राजकुमार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.