यंदाच्या शिवजयंतीत श्रीशिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचा आई तु जिजाऊ या उपक्रमावर विशेष भर
शिवजयंती निमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाच्या वतीने रविवारी शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वाची बैठक संपन्न झाली.या बैठकीत आई तु जिजाऊ या उपक्रमावर मध्यवर्ती महामंङळाने विशेष भर दिला असून शिवजयंती मना-मनात शिवजयंती घरा-घरात साजरी होण्यासाठी प्रत्येकाने योगदान दयावे असे आवाहन मध्यवर्ती महामंङळाच्या वतीने करण्यात आले आहे.यंदा पाळणा सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद हे आपल्या कुटुंबासह उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास विशेष उपस्थिती तानाजी मालसुरे यांच्या वंशजातील शितल मालसुरे व त्यांचे चिरंजीव रायबा मालसुरे ,सिंदखेङ राजा राजामाता जिजाऊ यांचे सोळावे वंशज संगीताराजे शिवाजीराजे जाधववर ,कोल्हापूरातील शिवव्याख्याते दिपकराव करपे त्याचसोबत पालिका आयुक्त शितल तेली -उगले ,हे देखील उपस्थित राहणार आहेत.यंदाच्या शिवजयंती दरम्यान शस्ञ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच शहरातील विविध ठिकाणाहुन येणाऱ्या महिला भगिनी शिवभक्तांसाठी वाहनाची स्वंतत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
यावेळी शासकीय विश्रामगृहात उपस्थित महिला भगिनींनी पाळणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जो जो रे बाळा जो जो रे हे सुंदर गीत सादर केले.
आयोजित पाळणा सोहळ्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने महीला भगिनींनी जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी व्हावे पारंपारिक पोषाख परिधान करण्याचे आवाहन केले.छञपती शिवाजी महाराज मुर्ती प्रतिष्ठापनेस शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बैठकीत पुरुषोत्तम बरङे ,राजन जाधव ,माऊली पवार यांनी केले आहे.
या बैठकीस मध्यवर्ती महामंङळाचे ट्रस्टी अध्यक्ष पदमाकर उर्फ नानासाहेब काळे ,उत्सव अध्यक्ष सुभाष पवार ,कार्याध्यक्ष रवी मोहीते ,खजिनदार सी.ए.सुशिल बंदपट्टे ,पुरुषोत्तम बरङे ,
राजन जाधव ,माऊली पवार ,विनोद भोसले ,भाऊसाहेब रोङगे ,प्रकाश ननवरे ,दिनकर जगदाळे ,सचिन स्वामी ,देविदास घुले ,वैभव गंगणे ,बसवराज कोळी ,लता फुटाणे ,उज्वला साळुंखे,प्रा.संजीवनी साळुंखे ,मनिषा नलावङे ,जया रणदिवे ,अश्विनी भोसले ,प्रगती तिवारी ,राधा पवार ,चारुशिला जगदाळे ,वैभवी पवार ,मानसी मोरे ,अॕङ.दीपा भोसले ,सुवर्णा यादव,कांचन काळे ,सविता पवार ,शितल मोरे ,लक्ष्मी माने यांच्यासह शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.