MH 13 News Network
सोलापूर, दि. 30- येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. मधुकर पवार उद्या (गुरुवारी)सेवानिवृत्त होत असून यानिमित्त त्यांचा मराठा समाज सेवा मंडळाच्यावतीने भव्य जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते व उच्च शिक्षण विभाग सोलापूरचे विभागीय सहसंचालक प्रा. डॉ .उमेश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे .
याप्रसंगी तुळजापूरचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार ,भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुण्याचे प्रकल्प संचालक संजय कदम आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्राचार्य डॉ. पवार यांनी 32 वर्षे प्राध्यापक आणि एक वर्ष प्राचार्य म्हणून छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये सेवा केलीअसून महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू सभागृहात हा सेवानिवृत्तीचा सोहळा उद्या सकाळी अकरा वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.