Sunday, July 20, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषीमंत्र्यांकडून आढावा; बी-बियाणे, खते वेळेत उपलब्ध करण्याचे निर्देश

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in कृषी
0
खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा कृषीमंत्र्यांकडून आढावा; बी-बियाणे, खते वेळेत उपलब्ध करण्याचे निर्देश
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

मुंबई दि. : यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली असून बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन केले जात आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही 18 लाख क्विंटल इतकी असून वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून राज्य शासनाने 24 लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे. त्यापैकी 13 लाख क्विंटल वितरीत केले असून आणखी 6 लाख क्विंटल वितरणाच्या स्थितीत आहे. तर उर्वरित बियाणे देखील वेळेत वितरीत केले जाईल, असे नियोजन केले जात असल्याची माहिती, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

खरीप हंगाम पूर्व तयारीच्या अनुषंगाने खते, बियाणे उपलब्धतेबाबत मंत्रालयात आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील, बी-बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गोंदवले, महाबीजचे श्री.कलंत्री, कृषी विद्यापीठांचे बियाणे विभाग प्रमुख, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे पदाधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी श्री.मुंडे म्हणाले की, सध्या राज्यशासनाने खते व कृषी निविष्ठा यांचे गैरव्यवहार रोखून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी कायदे प्रस्तावित केले आहे. हे कायदे विधिमंडळाच्या विचारार्थ प्रलंबित आहेत. सर्व प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना योग्य भावात मिळावेत तसेच खतांचा मुबलक साठा व त्याचे योग्य वितरण व्हावे, यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देशही मंत्री श्री .मुंडे यांनी दिले.

बी बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, कृत्रिम टंचाई इत्यादी बाबत शेतकऱ्यांना थेट तक्रार करता यावी व विभागाला व्यक्तिशः ती तक्रार सोडवता यावी, यासाठी शासनाचा व्हाट्सॲप क्रमांक 24 तासात सक्रीय करून शेतकऱ्यांना कळविण्याचे निर्देश श्री. मुंडे यांनी दिले .

दरम्यान राज्यात विशिष्ट कंपन्यांच्या बियाण्यांची मागणी केली जाणे, साठेबाजी याबाबतच्या उपाययोजना देखील  सुचवल्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कापूस-सोयाबीन योजना व अन्य योजनांच्या तसेच महाबीजच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी आवश्यक बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आले असून, कुठेही त्याची टंचाई भासणार नाही, असे नियोजन करण्यात येत आहे. कृषी निविष्ठा दुकानांमधून चढ्या भावाने केली जाणारी विक्री, कृत्रिम टंचाई, बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात. शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही एखाद्या ठिकाणी विभागाने कारवाई न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल, असेही श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कृषी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय.ए.कुंदन यांनी खरीप हंगाम पूर्व तयारीच्या अनुषंगाने खते, बियाणे उपलब्धतेबाबतची माहिती सादर केली.

Previous Post

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ८ जून रोजी यलो अलर्ट, तर ९ ते ११ जूनदरम्यान ऑरेंज अलर्ट  

Next Post

‘एंगेज महाराष्ट्र’ रोड शोमध्ये महाराष्ट्र शासनाचा सहभाग

Related Posts

दीड किमी पायी चालून योजनेचा आढावा; शिष्यपाल सेठींच्या हस्ते जलजीवन मिशनला नवे बळ
आरोग्य

दीड किमी पायी चालून योजनेचा आढावा; शिष्यपाल सेठींच्या हस्ते जलजीवन मिशनला नवे बळ

16 July 2025
उद्योगांनी पुढे येऊन युवकांना द्यावी आधुनिक कौशल्यांची ताकद”
कृषी

उद्योगांनी पुढे येऊन युवकांना द्यावी आधुनिक कौशल्यांची ताकद”

14 July 2025
पालकमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा |जिल्हाधिकारी आणि सीईओ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार |
आरोग्य

पालकमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा |जिल्हाधिकारी आणि सीईओ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार |

7 July 2025
पालखी मार्गावर ११ हजार शौचालयांची सुविधा.! ग्राम विकासाच्या निर्मल वारीस मिळतोय वारकऱ्यांचा आशीर्वाद..!
आरोग्य

पालखी मार्गावर ११ हजार शौचालयांची सुविधा.! ग्राम विकासाच्या निर्मल वारीस मिळतोय वारकऱ्यांचा आशीर्वाद..!

9 July 2025
भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ | सार्वजनिक आरोग्य विभागाची ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा
आरोग्य

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ | सार्वजनिक आरोग्य विभागाची ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

11 July 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकात्मिक संनियंत्रण कक्ष व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन..
कृषी

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकात्मिक संनियंत्रण कक्ष व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन..

6 July 2025
Next Post
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण १३२ व्या सत्राचा प्रवेश कार्यक्रम जाहीर

‘एंगेज महाराष्ट्र’ रोड शोमध्ये महाराष्ट्र शासनाचा सहभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.