MH 13 NEWS NETWORK
श्री गुरुनानक देव यांची ५५५ वी जयंती उत्साहात
सोलापूर : प्रतिनिधी
‘जो बोले सो निहाल सत श्री अकाल…, श्री वाहेगुरू जी का खालसा श्री गुरुजी की फतेह’, ‘सतनाम वाहे गुरु सतनाम…..’ च्या अखंड जयघोषात श्री गुरुनानकदेव यांची ५५५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी अमृतवेला साई गार्डन येथे सुरू असलेल्या श्री गुरुग्रंथसाहिबजी, श्री सुखमणीसाहिबजी आणि श्री जपजीसाहिबजीच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाला
यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच शहरातील श्री गुरुनानकदेव यांची ५५५ वी जयंती असल्याने ५५५ गरजूंना अन्नदान करण्यात आले. अमृतवेला ट्रस्टचे प्रमुख भाईसाब गुरुप्रीतसिंग रिंकू वीरजी यांच्या उल्हासनगर येथून सुरू असलेल्या कीर्तन दरबाराचे थेट प्रक्षेपण सोलापुरात शेकडो भाविकांनी पाहिले
याप्रसंगी श्री गुरुनानक नगरचे अध्यक्ष मोहन सचदेव, लालचंद वाधवानी, नारायण आनंदानी, शंकरलाल होतवानी, धनराज आनंदानी, इंदरलाल होतवानी, हरिष कुकरेजा, विकी वलेचा, करण कुकरेजा, जगदीश खानचंदानी, मुकेश हिरानंदानी, नंदकुमार परचानी, प्रकाश परीयानी, राम संतानी, दीपक धामेचा, चंदन रामचंदानी, रोहित अडवाणी, संजय खानचंदानी, ताराचंद परचानी, गौरव कुकरेजा, राऊंड टेबल इंडिया सोलापूर शाखेचे अध्यक्ष अजय सोनी, सचिव प्रतीक भागवत, खजिनदार नितेश सचदेव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास सोलापूर ॲचिव्हर्स राऊंड टेबल इंडियाचे सहकार्य लाभले.
श्री गुरुनानक देव यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिरात १२५ जणांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.