MH 13 News Network
सोलापुरातील एका विद्यार्थ्याने दयानंद कॉलेजच्या बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
प्रीतम निलेश राऊत वय वर्ष 22, हा विद्यार्थी युवक टिळक चौक येथील सोलापूर सहकारी बँकेच्या वरच्या मजल्यावर रहात होता.
आज सोमवारी 17 मार्च रोजी काही अज्ञात कारणाने चार वाजून वीस मिनिटांच्या सुमारास दयानंद कॉलेज येथील बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून अज्ञात कारणाने उडी मारल्याने जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

त्यास उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारापूर्वीच तो मयत झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल एन.डी. साळुंखे हे प्रीतम राऊत यास सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यासाठी घेऊन गेले होते. अशी नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रीतम हा दयानंद कॉलेज येथे शिकत असल्याची माहिती आहे. परंतु या तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णसेवक लादेन यांच्या मदतीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
Pritam raut student
solapur