पी.बी. ग्रुप च्या वतीने विश्वरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्ताने उत्सव अध्यक्षपदी बाबा गायकवाड, कार्याध्यक्षपदी प्रथमेश सुरवसे, सचिवपदी सिद्धांत तळभंडारे व खजिनदारपदी रवी म्यातरोल्लू यांची बैठकीत निवड

भीमजयंती सन 2025 पदाधिकारी निवडी प्रसंगी हजारो कार्यकर्ते उपस्थित ….
सोलापूर :- रविवार दि. 16/03/2025 रोजी सायं 6.00 वाजता बुधवार पेठ, थोरला राजवाडा, मिलिंद नगर येथील प्रबुद्ध भारत चौक येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने सालाबादप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप)ची बैठक व नूतन पदाधिकाऱ्यांची पी.बी. ग्रुप चे सल्लागार ज्येष्ठ भारत बाबरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रबुद्ध भारत तरुण मंडळ ( पी.बी.ग्रुप)चे ज्येष्ठ सल्लागार बाबरे व गौतम (मामा) इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सामुदायिक बुध्दवंदना घेऊन पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 व्या जयंतीनिमित्त ज्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी पी.बी. ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक आनंद (दादा) चंदनशिवे, गौतम इंगळे, भारत बाबरे, सो.म.पा. मा. नगरसेवक गणेश पुजारी, श्रीमंत जाधव, पी.बी.ग्रुपचे मार्गदर्शक गौतम (महाराज) चंदनशिवे, दिलिप कांबळे, चंद्रकांत सोनवणे इ. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद (दादा) चंदनशिवे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुप चा इतिहास ज्यांच्या कुटुंबातून प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे निर्माती झाली असे गौतम मामा इंगळे या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले आहे. प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे टप्प्याटप्प्याने प्रगती कशी झाली. मंडळाच्या प्रगतीपेक्षा या मंडळाचा या भागातील मिलिंद नगर बुधवार पेठ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करत होतो. परंतु वर्षभरामध्ये आपण सर्वच महापुरुषांच्या जयंती व सामाजिक उपक्रम आपण या मंडळाच्या माध्यमातून राबवत असतो. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी लढाई केलेलीआहे..बाबासाहेब यांनी जो संघर्ष केलेला आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांना अनुसरून तरुणांनी जागृत झाले पाहिजे. या तरुणांना मला एवढेच सांगायचे आहे की गुटखा खाण्याचे व दारूचे पिण्याचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आजच्या तरुणांमध्ये कॅन्सर हा आजार मोठ्या प्रमाणे मध्ये पसरत आहे. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने निर्धार करायचे आहे की गुटखा व दारूचे व्यसन सोडून द्यावे व तसेच तरुण मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे व ज्या तरुण मुलांना शिकण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाही अशा मुलांना आपण प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने त्यांना शिकण्यासाठी मदत करू व त्यांना योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करू.
यावेळी मंचावर उपस्थित असलेले मान्यवर प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप) चे प्रमुख मार्गदर्शक आनंद (दादा) चंदनशिवे, सो.म.पा. मा. नगरसेवक गणेश पुजारी, प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम ( मामा) इंगळे, एस के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष रविकांत (बॉस) कोळेकर, प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप) चे प्रमुख गौतम (महाराज) चंदनशिवे, पी.बी.ग्रुप माजी अध्यक्ष आदित्य चंदनशिवे, अंबादास कापुरे, बापू शिंदे, सुखदेव इंगळे, दिलीप कांबळे, चाचा सोनवणे, श्रीमंत (आप्पा) जाधव, अविनाश भडकुंबे, धनराज(बाप) तळभंडारे, धम्मपाल मैंदर्गीकर, ॲड. विशाल मस्के, प्रकाश माने, धीरज वाघमोडे, राजू अंकुश, गौतम इंगळे, कुमार कांबळे, प्रमोद शिंदे, सुबन्ना स्वाके, सिद्धांत सुर्वे, अक्षय मस्के, यशवंत अडाकूल, जनार्दन थोरात, नितीन बंदपट्टे, बलभीम शिंदे, शाम चव्हाण, केवल लालबेगी, कुमार सांगे, भैय्या कांबळे, सुनील गायकवाड, कुमार कांबळे, अजय ढेने, उमेश इंगळे, रोहन लोंढे, विकी जाधव, सिद्धांत मगर, रवी सकट, अनिल अलदर, मनोज थोरात यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्वानुमते प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी.बी. ग्रुपची बैठक व नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकाऱ्यांची निवड खालील प्रमाणे :-
- उत्सव अध्यक्ष :- बाबा गायकवाड
- कार्याध्यक्ष :- प्रथमेश सुरवसे
- सचिव :- सिद्धांत तळभंडारे
- उपाध्यक्ष :-प्रसन्न तळभंडारे, महेश स्वाके, बाबा संदोल्लू, प्रतिक वाघमारे, शुभम गंगणे, नवल बडेकर, श्रीकांत वाघमोडे, सुमित चंदनशिवे, भीमा मस्के, सुमित जाधव, आशिष पात्रे, विनय शिरसागर, शिरीष गायकवाड, अशितोष इंगळे, सुनिल बनसोडे, आदित्य गायकवाड, राहुल माळाळे, विशाल गायकवाड, कैलाश अडाकुल, महेश शिंदे, गणेश डोळसे.
- खजिनदार :- रवि म्यातरोल्लू,
- सहखजिनदार :- अजय अंकुश.
- सहसचिव :- योगेश वाघमोडे.
- सल्लागार :- भारत बाबरे, श्रीमंत (आप्पा) जाधव, सुबाण्णा स्वाके, अनिल चंदनशिवे, गौतम इंगळे, विजय (मामा) इंगळे, प्रमोद शिंदे, सुनील गायकवाड, अरुण बडेकर, अंबादास कापुरे, सुखदेव इंगळे, ज्ञानेश्वर कांबळे, प्रकाश माने, नितीन बंदपट्टे, संजय सरवदे, नितीन कांबळे, बाळू इंगळे, भीमराज इंगळे, मिथुन बनसोडे, मंगेश अंकुश, दीपक शिंदे
- मिरवणूक प्रमुख :- अक्षय इंगळे, धीरज वाघमोडे, नाना कापुरे, राहुल माळाळे, विशाल गाडे, संतोष चंदनशिवे, शेखर ढाळे, अनिस सय्यद, अरबाज शेख, विजय इंगळे, बाळराज जाधव, अमर इंगळे, जयराज सांगे, अभिजीत गायकवाड, उमेश रणदिवे, निशांत जाधव, रवि सकट, आनंद कांबळे, करण कांबळे, अभिजीत कापुरे, संजय इंगळे, अमित माने, अजय इंगळे, धोंडिबा कापुरे, पिंटु वाघमोडे, श्रावण सरवदे, अरविंद गायकवाड, अमर सुरवसे, अनिल ठोंबरे.
- प्रसिद्धीप्रमुख :- अक्षय मस्के,
- कायदेशीर सल्लागार प्रमुख :- ॲड. विशाल मस्के, ॲड. मलिक कांबळे
- कार्यालय सचिव :- आदित्य साबळे, देविदास मुनगानोलू.
यावेळी या कार्यक्रमास गोपीनाथ जाधव, महादेव तळमोहिते, विकी कांबळे, रवी काकडे, अनिश सय्यद,संजय इंगळे, महेश निकंबे, सुमित जाधव, सतीश शिंगे, वैभव तळभंडारे, रत्नाकर इंगळे, पंडित गायकवाड, प्रकाश मस्के, जनार्दन थोरात, प्रभाकर बनसोडे, सुरेश क्षिरसागर, श्रीशैल भोरे, खंडू मोहिते, जयंत शिंदे, अमर सोनकांबळे, अभिजीत गायकवाड,संदीप कांबळे, प्रदीप गायकवाड, लखन बागले, राकेश बागले, विजय इंगळे, कुमार कांबळे, ऋषीराम गायकवाड, रोहन बागले , बलभीम शिंदे, गणेश बंदपट्टे, अशोक आकाशलोट, अमोल बनसोडे, शैलेश बनसोडे, मनोज ठाकूर, रवींद्र कांबळे, प्रताप वाघमारे, संदीप सरवदे, सुरज वाघमोडे, सुव्हेन माने, संजीव देशमुख, हरी गाव गौडा , आतिश चंदनशिवे, अमर इंगळे, लक्ष्मण वाघमारे, लखन चंदनशिवे, विनायक मस्के, सतीश घेचंद, विनायक सरवदे, प्रदीप गवळी, सिद्धार्थ चंदनशिवे, प्रितेश ओहाळ, धम्मजीत उघडे, अभिषेक गायकवाड, सागर अमुगे, मनीष साळवे, बंटी तळभंडारे, संजय उडानशिव, अण्णा साबळे, प्रकाश उडानशिव, अमर सुरवसे, विनोद घेचंद, अनमोल भूताळे, अमन खरे, राम अकलवाडी, अजिंक्य पुजारी, धनंजय मिर्चेकर, शेखर ढाले, सुशांत मुलुख, इरफान मोमीन, उमेश डोलारे, दिनकर खराटे, शिवाजी दोड्डीमणी, गणेश दोड्डीमणी, संतोष चंदनशिवे, बाबा अडाकुल, इंद्रजित बागले, धनराज गायकवाड, मिथुन बनसोड, अनिश सय्यद, रवी सकट, रंगा वाघमारे, सागर देडे, शेखर डेहाळे, सिकंदर कांबळे, बंटी सुरवसे, दादाराव कांबळे, नितीन जाधव, मयूर कसबे, आशिष पात्रे, सोनू क्षीरसागर, शिरीष गायकवाड, पिंटू देवकुळे, सिकंदर शेख, अण्णा वाघमारे, भैया कांबळे, राज कांबळे, अमोल कुंदुर, अमर वाघमारे, सागर राजगुरू, अजय ढोणे, शिरीष बनसोडे, तात्या गायकवाड, सुमित कसबे, बालाजी भिंगारे, लखन पवार, सचिन बनसोडे, अक्षय बनसोडे, हुसेन शेख, नागराज रोतोल्लु, रमेश मुनगल, विनोद घेचंद, सिद्राम चिटलापल्ली, धनराज जोगदिया आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ मस्के, गौतम शिंदे, राहुल माळाळे, राजू साबळे, आशुतोष इंगळे, राहुल ओव्हाळ, राहुल इंगळे, अमोल बनसोडे, विजय इंगळे, गणेश डोळसे, संदीप परमार, ओम अडाकूल, जयराज सांगे, भीमा मस्के यांनी परिश्रम घेतले.
यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळ नूतन पदाधिकाऱ्यांचे फेटे व हार घालून हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचा समारोह राष्ट्रगीत घेऊन करण्यात आला. सदर नुतन पदाधिकारी बैठकीला सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
[5:29 pm, 17/3/2025] +91 98904 40480: मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते महिला बचत गट स्टॉलचे उदघाटन….
दोन दिवस चालणार महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शनास शहरातील नागरिकांनी भेट दयावी…
सोलापूर — जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर महानगर पालिका, महिला बालकल्याण विभाग व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आयोजित महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाल बाजारपेठ मिळावी, त्याचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने दिनांक 17 व 18 मार्च 2025 या दोन दिवसीय वस्तु व खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.त्याचे उदघाटन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार, उपायुक्त तैमूर मुलाणी, उपायुक्त आशिष लोकरे,मुख्य लेखापाल राजरत्न जवळगेकर,सहा. आयुक्त गिरीष पंडित, सहा.आयुक्त शशिकांत भोसले, सहा आयुक्त अनिता मगर, नगर अभियंता सारिका आक्कूलवार, विधान सल्लगार संध्या भाकरे, डॉ कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, समीर मुलाणी,उज्वला गणेश,डॉ. सुवासिनी वाळवेकर, आरोग्य निरीक्षक अंजली काकडे, मेट्रन संगीता गुरव,क्षमा डबरी आदी मान्यवर उपस्थिती होते.या प्रदर्शनामध्ये ड्रेस मटेरियल , साडी , लग्नातील रुकवत साहित्य , कडक भाकरी,शेंगा चटणी,,शेंगा पोळी, जवस,कारळ,शेंगा,शेंगा पोळी, धपाटे , सर्व प्रकारचे पापड विक्री, मसाले , तिखट मसाले,खाद्यपदार्थ,हर्बल तेल, झाडू, खराटा, मूर्ती विक्री, कॉस्मेटिक साहित्य , वडा पाव,पाणी पुरी, चायनीज पदार्थ, फ्रुट धपाटे कॉकटेल पेय, मसाले उन्हाळी काम , बिस्कीट,अगरबत्ती,धूप,ज्यूस, गुळ पावडर पुरण प्रीमिक्स नाचणी ज्वारी बिस्कीट हेल्थ ड्रिंक पावडर, हातानी बनवलेले व आरोग्यदायी ताजे, स्वच्छ व चविष्ट खाद्य पदार्थ, सुगंधी वस्तु अगरबत्ती, विविध प्रकारचे मसाले, चटणी व पापड , इतर ही खाद्यपदार्थ, घरगुती साहित्य, दररोज वापरातील स्वच्छता करिता लागणारे केमिकल साहित्य आदी शहरी महिलानी तयार केलेले वस्तूची विक्री प्रदर्शना मध्ये होणार आहे .प्रदर्शन ठिकाणी विविध शासकीय योजना बद्दल माहिती देण्यात येणार आहे महिला व बाल कल्याण विभागातील योजना , दिव्यांग कल्याण विभाग, समाजविकास विभागातील सर्व योजना , पी एम स्वनिधी योजने अंतर्गत स्वनिधी से समृद्धी योजने अंतर्गत ८ योजनाचा लाभ देणे ,तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत योजनेचे लाभा बाबत माहिती ,पंतप्रधान आवास योजना आदी योजने बाबत अधिकारी हे २ दिवस माहिती देणार आहेत.तसेचसोलापूर मनपा महिला कर्मचाऱ्यासाठी सुदंर हस्ताअक्षर, निबंध,रस्सीकेच,काव्या वाचन, पाककला इत्यादी स्पर्धा सोलापूर महानगरपालिका , इंद्र भवन परिसर, पार्क चौक, सोलापूर येथे आयोजन करण्यात आले आहे.दोन दिवस चालणार महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शनास शहरातील नागरिकांनी भेट दयावी असे आव्हान आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.