MH 13 News Network
लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसला अच्छे दिन आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस मधील सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप (दादा ) चाकोते आमदारकीसाठी रिंगणात उतरले आहेत. पदयात्रा काढून इच्छुक उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत.
आगामी विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीसाठी भक्कम असल्याची चर्चा सर्वच पक्षात केली जात आहे. शहर उत्तर हा भाजपाचा बालेकिल्ला असून या ठिकाणी तरुण लिंगायत समाजाचा चेहरा म्हणून सुदीप चाकोते आपले नशीब आजमावणार आहेत. लिंगायत समाजासोबत इतर समाजातील नागरिकांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
उत्तम संघटन कौशल्य, तरुणांची तगडी फळी, पक्षातील ,समाजातील वरिष्ठ नेत्यांशी असणारे स्नेहसंबंध, सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे सलोख्याचे संबंध ही त्यांची जमेची बाजू आहे.
अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या माध्यमातून राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर असणारे सुदीप चाकोते यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांना भेटून मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस सह इतर पक्षातील मराठा नेत्यांची दमदार साथ होती.
उद्या शनिवारी सकाळी साडेदहा वाजता सुदीप चाकोते यांच्या कार्यालयापासून काँग्रेस भवन पर्यंत पदयात्रा काढण्यात येणार असून त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, माजी महापौर, नगरसेवक पदाधिकारी यांनी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांच्या मित्र परिवाराने केले आहे.