अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक – ‘चलो मुंबई’ आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी मनोज जरांगे पाटलांचा निर्धार
सोलापूर /प्रतिनिधी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे आज 10 जून रोजी मंगळवारी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे नेतृत्व मराठा समाजाच्या आंदोलनाचे प्रणेते श्री. मनोज जरांगे पाटील यांनी केले.

आगामी २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘चलो मुंबई’ आंदोलनाच्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत सुमारे दीड तास विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

यावेळी श्री. जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना ठामपणे सांगितले की, “संघर्ष अर्धवट सोडून देणे शक्य नाही. शिवाजी महाराजांनी एकच लढाई लढली नव्हती, तसाच आपलाही लढा अखंड राहील. समाजात फूट पाडणाऱ्या अफवांपासून सावध राहा आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याचा विचार करून संघर्ष करा.”
बैठकीत एकमताने २९ जून २०२५ रोजी राज्यव्यापी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा आणि व्यापक नियोजन निश्चित करण्यात येणार आहे.
या बैठकीस राज्यातील विविध भागातून मराठा समाज बांधव उपस्थित होते.सोलापूर जिल्ह्यातील मराठा राज्य समन्वयक श्री. माऊली पवार, डॉ. प्रमोद पाटील, श्री. पंडित बापू ढवण, श्री. सोमनाथ बापू पवार, ॲड. श्रीरंग लाळे, श्री. शंकर भोसले, श्रीधर पाटील यांच्यासह अनेक मराठा सेवक उपस्थित होते.हा लढा केवळ आरक्षणापुरता मर्यादित नसून, तो मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक हक्कांसाठीचा निर्णायक टप्पा ठरणार असल्याचे मत या बैठकीतून व्यक्त झाले.
@top fans Manoj Jarange Patil Manoj Jarange PatilManoj Jarange Patil