Sunday, June 22, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

MH 13 News by MH 13 News
17 April 2024
in Blog
0
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज

१९ एप्रिल रोजी मतदान ; १० हजार ६५२ मतदान केंद्र

मुंबई, : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. 19 एप्रिल  रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 10,652 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत 95,54,667 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी बॅलेट युनिट (बीयु) 21,527 तर कंट्रोल युनिट (सीयु) 13,963 आणि 14,755 व्हीव्हीपॅट उपलब्ध असून 97 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके उपस्थित होते.

वेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 97 उमेदवार लढत आहेत. या निवडणूकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.  तसेच गडचिरोली मतदारसंघात सात हॅलिकॉप्टर पाठविण्यात आले आहेत. यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही      रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दिव्यांग व ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह    मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या  ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये ईटीपीबीएसद्वारे एकूण 9,416 मतदार तर 12डी या अर्जाद्वारे 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग असे एकूण 6,630 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. गडचिरोली-चिमुर (अज) या लोकसभा मतदार संघातील आमगांव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी या चार विधानसभा मतदारसंघात व भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगांव एका विधानसभा मतदारसंघात अशा एकूण पाच विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी पाचही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

राज्यातील पहिल्या टप्प्यातील 5 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्व तयारी झालेली आहे. या पाच लोकसभा मतदार संघातील निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे.

मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाई

कायदा व सुव्यवस्थांतर्गत 11 एप्रिलपर्यंत 43,893 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 723 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 70,967 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

        राज्यामध्ये दि. 1 मार्च ते 11 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 39.10 कोटी एकूण रोख रक्कम तर 27.18 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 63.82 कोटी रुपये, ड्रग्ज 212.82 कोटी, फ्रिबीज 0.47 कोटी आणि इतर बाब अंतर्गत 78.02 कोटी रुपये अशा एकूण 421.41 कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

18722 तक्रारी निकाली

16 मार्च ते 13 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 2337 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 2331 (99.63%) तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील 19018 तक्रारीपैकी 18722 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे 54 प्रमाणपत्र वितरित

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 54 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय तयारीची माहिती खालीलप्रमाणे

अ.क्र.मतदार संघाचे नावमतदान केंद्रेनिवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्याबॅलेट युनिट (बीयु)कंट्रोल युनिट(सीयु)व्हीव्हीपॅट
109 – रामटेक240528590432833372
210- नागपूर210526516528742951
311- भंडारा-गोंदीया213318551828663097
412- गडचिरोली-चिमूर189110233023302517
513-चंद्रपूर211815261026102818
एकूण10,6529721,52713,96314,755
अ.क्र.मतदार संघाचे नावपुरुष मतदारमहिला मतदारतृतीयपंथी मतदारएकुणETPBS द्वारे मतदान करणारे सेवा मतदार85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12D अर्जांची संख्या.
19- रामटेक10,44,89110,04,1425220,49,08518671070
210 – नागपुर11,13,18211,09,87622322,23,28110011385
311- भंडारा-गोंदिया9,09,5709,17,6041418,27,18832111465
412-गडचिरोली -चिमुर8,14,7638,02,4341016,17,20714831438
513-चंद्रपुर9,45,7368,92,1224818,37,90618541272
एकूण48,28,14247,26,17834795,54,6679,4166,630

मतदारांची संख्या खालीलप्रमाणे

वयोगटानुसार मतदार संख्या

अ.क्र.मतदार संघाचे नाव18-1920-2930-3940-4950-7980 +
19- रामटेक31,7253,83,2764,90,3394,76,9716,20,36146,413
210 – नागपुर29,9103,37,9615,06,3725,07,6407,70,70070,698
311- भंडारा-गोंदिया31,3533,66,5703,99,1153,98,7495,93,13238,269
412-गडचिरोली -चिमुर24,0263,28,7353,56,9213,48,5855,25,38133,559
513-चंद्रपुर24,4433,42,7874,25,8294,20,9655,86,40237,480
एकूण1,41,457 17,59,32921,78,576 21,52,91030,95,9762,26,419

मतदारांचा तुलनात्मक तपशील :-

अ.क्र.मतदार संघाचे नाव2014 मधील मतदार संख्या2019 मधील मतदार संख्या2024 मधील मतदार संख्या
19- रामटेक16,77,26619,22,76420,49,085
210 – नागपुर19,00,78421,61,09622,23,281
311- भंडारा-गोंदिया16,55,85218,11,55618,27,188
412-गडचिरोली -चिमुर14,68,43715,81,36616,17,207
513-चंद्रपुर17,53,69019,10,18818,37,906

पहिल्या टप्प्यातील Observer (निरिक्षक):-

क्रमांक व मतदारसंघGeneral ObserverPolice ObserverExpenditure Observer
09 – रामटेक112
10- नागपूर11
11- भंडारा-गोंदीया111
12- गडचिरोली-चिमूर11
13-चंद्रपूर111
एकूण536

दुसऱ्या टप्प्यातील 05 बुलढाणा, 06 अकोला, 07 अमरावती, 08 वर्धा, 14 यवतमाळ-वाशिम, 15 हिंगोली, 16 नांदेड, 17 परभणी या 8 लोकसभा मतदारसंघात दि.26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.             तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील 02, पश्चिम महाराष्ट्रातील 07 व कोकणातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात दि.15.04.2024 पर्यंत रायगड -08 , बारामती – 05, धाराशीव (उस्मानाबाद) – 03, लातूर -01, सोलापुर – 03, माढा -02, सांगली -03, सातारा – 03, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 01, कोल्हापुर -06, हातकणंगले -10  इतके नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2024 अशी आहे.

तिसऱ्या टप्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील दि.11 एप्रिल 2024 पर्यंत अद्यावत मतदारांच्या संख्येचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.मतदार संघाचे नावपुरुष मतदारमहिला मतदारतृतीयपंथी मतदारएकुणमतदान केंद्रे
132-रायगड8,20,0258,47,220416,67,2492185
235-बारामती12,38,60011,27,67911623,66,3952516
340-धाराशीव (उस्मानाबाद)10,51,4619,39,9498119,91,4912139
441-लातूर10,34,3589,40,6116119,75,0302125
542-सोलापुर10,40,0899,87,11519920,27,4031968
643-माढा10,34,9999,55,0356919,90,1032030
744-सांगली9,52,0059,13,84311218,65,9601830
845-सातारा9,58,4319,30,0987618,88,6052315
946-रत्नागिरी-सिंधुदुर्ग7,13,6907,35,3111214,49,0131942
1047-कोल्हापुर9,83,3719,50,1979119,33,6592156
1148-हातकणंगले9,24,8788,87,2749518,12,2471830
एकूण1,07,51,9071,02,14,3329162,09,67,15523,036

        तिसऱ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.मतदार संघाचे नाव2014 मधील मतदार संख्या2019 मधील मतदार संख्या2024 मधील मतदार संख्या
132-रायगड15,32,78116,52,96516,67,249
235-बारामती18,13,55321,14,66323,66,395
340-धाराशीव(उस्मानाबाद)17,59,18618,89,74019,91,491
441-लातूर16,86,95718,86,65719,75,030
542-सोलापुर17,02,73918,51,65420,27,403
643-माढा17,27,32219,09,57419,90,103
744-सांगली16,49,10718,09,10918,65,960
845-सातारा17,19,99818,48,48918,88,605
946-रत्नागिरी-सिंधुदुर्ग13,67,36214,55,57714,49,013
1047-कोल्हापुर17,58,29318,80,49619,33,659
1148-हातकणंगले16,30,60417,76,55518,12,247

वयोगटानुसार मतदार संख्या :-

अ.क्रमतदार संघाचे नाव18-1920-2930-3940-4950-5960-6970-7980 +
132-रायगड19,5642,95,6903,48,3033,35,8882,81,5102,02,5531,20,83762,904
235-बारामती29,7744,29,2705,72,4525,09,4863,69,1882,41,5931,40,16874,464
340-धाराशीव (उस्मानाबाद)39,6954,01,5304,31,2393,91,5883,17,5722,05,7241,30,05674,087
441-लातूर36,8624,05,2984,54,4984,20,3262,99,5451,86,6221,04,59567,284
542-सोलापुर32,6803,98,8764,64,3024,20,3673,30,0362,10,6641,16,14054,338
643-माढा35,0053,88,6734,19,2344,02,2643,35,5362,20,7021,24,93363,756
744-सांगली31,1073,51,0413,88,2913,74,1333,22,4482,12,2351,25,02861,677
845-सातारा36,4193,27,1993,96,0034,00,5103,24,3362,20,6071,26,83856,693
946-रत्नागिरी -सिंधुदुर्ग16,2892,38,4952,70,4533,04,8552,68,3281,82,7181,12,27455,601
1047-कोल्हापुर28,2653,52,7633,90,7583,97,5483,40,4272,28,2671,38,53857,093
1148-हातकणंगले26,0903,34,6723,80,7563,71,9713,24,1522,09,1921,17,15248,262
          एकूण3,31,750 39,23,507 45,16,289 43,28,93635,13,07823,20,87713,56,5596,76,159

तिसऱ्या टप्प्यातील Observer (निरिक्षक):-

क्रमांक व मतदारसंघGeneral ObserverPolice ObserverExpenditure Observer
32-रायगड111
35-बारामती11
40-धाराशीव(उस्मानाबाद)111
41-लातूर11
42-सोलापुर111
43-माढा11
44-सांगली111
45-सातारा11
46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग111
47-कोल्हापुर111
48-हातकणंगले11
एकूण11611

तिसऱ्या टप्प्यातील Electronically Transmitted Postal Ballet System (ETPBS) द्वारे मतदान करण्यास पात्र मतदारांची माहिती :-

अ.      क्र.क्रमांक व मतदारसंघमतदारांची संख्या
132-रायगड1350
235-बारामती2212
340-धाराशीव(उस्मानाबाद)3740
441-लातूर3363
542-सोलापुर1800
643-माढा4840
744-सांगली5997
845-सातारा9573
946-रत्नागिरी-सिंधुदुर्ग1032
1047-कोल्हापुर6321
1148-हातकणंगले4119
 एकुण44,347

००००

Tags: मतदानाचा टक्का

Previous Post

मुंबई शहर जिल्ह्यात सी-व्हिजिल ॲपवर ६१ तक्रारी प्राप्त, सर्व तक्रारीचे निवारण

Next Post

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा – राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Related Posts

विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यशोशिखर गाठावे..!जन्मेनजय राजे  भोसले
Blog

विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यशोशिखर गाठावे..!जन्मेनजय राजे भोसले

22 June 2025
सोलापूर बाजार समिती | ग्रामपंचायत मतदारसंघातून देशमुख,चिवडशेट्टी,कळके विजयी..
Blog

सोलापूर बाजार समिती | ग्रामपंचायत मतदारसंघातून देशमुख,चिवडशेट्टी,कळके विजयी..

28 April 2025
ब्लॅक मंडे | शेअर बाजार ‘धडाम’ कोसळला ; ट्रम्प च्या टेरिफ कार्डचा दणका.!
Blog

ब्लॅक मंडे | शेअर बाजार ‘धडाम’ कोसळला ; ट्रम्प च्या टेरिफ कार्डचा दणका.!

7 April 2025
जलसंधारणासाठी कटिबद्ध राहूया- मंत्री गुलाबराव पाटील
Blog

जलसंधारणासाठी कटिबद्ध राहूया- मंत्री गुलाबराव पाटील

21 March 2025
‘महाराष्ट्र भूषण’ शिल्पकार ‘राम सुतार’ !
Blog

‘महाराष्ट्र भूषण’ शिल्पकार ‘राम सुतार’ !

21 March 2025
फेक पनीर,चीझने सभागृहातील वातावरण तापले..! अजितदादांनी दिले उत्तर
Blog

फेक पनीर,चीझने सभागृहातील वातावरण तापले..! अजितदादांनी दिले उत्तर

13 March 2025
Next Post
वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा – राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा – राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.