MH 13News Network
काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सोमवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली….
आज सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत राज्याचे माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे,बाबा मिस्त्री, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.