MH 13News Network
मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा उपोषणासाठी बसलेले आहेत. पाणी आणि उपचार घेण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळल्याचे समोर आलेले असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. 14 फेब्रुवारी वार बुधवारी त्यांच्या नाकातून रक्त वाहत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
अंतरावलीच्या दिशेने अनेक मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी निघालेले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांची सततच्या उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे.आज पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून धक्कादायक म्हणजे त्यांच्या नाकातून रक्त वाहत असल्याचं दिसून येतंय.
मागील दोन दिवसापासून अनेक मराठा महिला भगिनी पाणी घेण्यासाठी त्यांना सततची विनंती करत असल्याचे वृत्त समोर आलेले असून पाटील यांनी वैद्यकीय उपचार तसेच पाणी घेण्याची ठाम नकार दिला आहे.
#maratha #manojjarangepatil #antarwalisarati