महेश हणमे / 9890440480
मराठा आरक्षणासाठी आणि शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्ती लवकरात लवकर करून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले.राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज अंतरवाली सराटीकडे धावून निघाला. अखेरीस जरांगे पाटील यांनी उपचारासाठी तयारी दर्शवली.
आज बुधवारी सकाळी जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता.10 फेब्रुवारीपासून जरांगे पाटील हे उपोषणास बसले आहेत. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. पण आज सकाळी जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे दिसून आले.नाकातून रक्त येत होते. तरीही पाटील यांनी उपचारास नकार दिला होता.
आज बुधवारी अखेरीस दुपारी दीड वाजता त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी शेकडो महिला भगिनींना डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.त्यांनी वारंवार विनवणी करून पाणी व उपचार घेण्याची विनंती केली होती.
सद्यस्थितीत जरांगे पाटील यांच्यावर स्थानिक डॉक्टर उपचार करत असून सलाईन लावले आहे.तरीही हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपोषण स्थळी बसलेला आहे.
शिंदे – फडणवीस सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावा, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन भर जाहीर सभेत आश्वासने दिली होती. कुणबी प्रमाणपत्रसाठी अधिसूचना काढण्यात आली होती.त्याची अंमलबजावणी नेमकी कधी होणार..? अशी चर्चा उपोषणस्थळी सुरू आहे.