MH 13 News Network
सोलापुरात अचानक कावळे,बगळे, घारी यांची अचानक मरतुक झाल्याने प्रशासनाने तात्काळ दखल घेत छत्रपती संभाजी महाराज तलाव, भुईकोट किल्ला परिसर या ठिकाणी अलर्ट झोन जाहीर केले. आज सोमवारी सकाळी महापौर बंगल्या जवळील मच्छी मार्केट बोळानजिक असलेल्या रेल्वेच्या रिकाम्या जागेवर काही कावळे मरून पडलेले आढळून आले आहेत.
येथील स्थानिक नागरिकांनी याबाबत एम एच १३ न्यूज ची संपर्क साधला होता. प्रत्यक्ष भेटीनंतर या ठिकाणी झाडावर अनेक कावळे असून काही कावळे मरून पडलेले दिसून आले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी त्याची तातडीने दखल घेतली जाईल असे सांगितले.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने या ठिकाणी स्पॉट व्हिजिट केली. भेटीनंतर त्यांनी एम एच तेरा न्यूजशी बोलताना सांगितले की संबंधित कार्यालयास याबाबत तातडीच्या सूचना दिल्या आहेत.
प्रशासन अलर्ट मोडवर..!
महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून या भागातील कुक्कुट पक्षी मांस विक्रेते , कुक्कुट पक्षी याबाबत ही बैठक बोलण्यात आली आहे. अशी माहिती दिली.
सोलापूर महापालिका प्रशासन अंतर्गत पशुवैद्यकीय विभाग बर्ड फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. बर्ड फ्यू हा पक्षांपासून माणसांना होणारा प्राणीजन्य आजार असला तरी सदर आजार होण्यासाठी मनुष्याचा त्या मृत बाधित पक्षाशी थेट संपर्क यावा लागतो,जसे की हात लावणे,उचलणे इत्यादी गोष्टीमुळे याचा प्रसार होऊ शकतो.
तरी मृत पक्षांना सर्वसामान्य नागरिकांनी हात लावू नये. संबंधित ठिकाणची पाहणी करण्यात आली आहे. योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.