MH 13 NEWWS NETWORK
लाडकी बहीण योजनेत काही बदल केले जाणार परंतु ही योजना बंद होणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
ही योजना गरीब घटकांच्या महिलांकरिता आहे. हे पण मी उत्तराच्या निमित्ताने सभागृहात सांगू इच्छितो. असे सांगताना पवार पुढे म्हणाले की,कधी कधी योजना येते परंतु काही गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करावी लागते. आम्ही दुरुस्त करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर टीका केली होती. महाविकास आघाडीच्या वतीने वारंवार लाडकी बहीण योजना बंद होणार याबाबत प्रश्न विचारले जात होते.
कुठल्याही बहिणीचे पैसे कुठल्याही परिस्थितीत परत घेतले जाणार नाहीत अशी हमी त्यांनी दिली. गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही. मात्र योजनेत दुरुस्ती केली जाईल असे अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.