Friday, October 9, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सायबर कॉमिक बुकचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते अनावरण

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
सायबर कॉमिक बुकचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते अनावरण
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

१ जुलैपासून जिल्ह्यात सायबर जागरुकता अभियान

सातारा दि. 7 : सध्या मोबाईल, संगणक, ऑनलाईन बँकिंग, सोशल नेटवर्किंग साईट, इत्यादी गोष्टींचा वापर युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला असून मोबाईल, टॅब, संगणक व इंटरनेट हे व्यक्तीचे दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनले आहेत. मोबाईलमधील वेगवेगळ्या अॅप्लीकेशच्या माध्यमातुन विविध अॅपसद्वारे सायबर गुन्हयांमध्ये मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सायबर गुन्हयांमध्ये फेसबुक, इंन्स्टाग्राम, टेलीग्राम, शेअरचॅट, ट्विटर अशा सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून व्यक्तींची बदनामी करणे, आर्थिक फसवणूक केली जात आहे. तसेच सोशल मिडीयावरुन फिशींग, आयडेंटीटी श्रेष्ट, रैमसनवेअर अटॅक, हॅकिंग, सायबर स्कंमस, सायबर बुलींग, स्टाकिंग, सॉफ्टवेअर पायरसी, सोशस मिडीया फ्रॉडस, ऑनलाईन ड्रग्ज ट्राफिकिंग, इलेक्ट्रॉनिक मनी लॉन्डरींग, सायबर इक्स्टॉर्शन, ऑनलाईन रिक्रूटमेंट फ्रॉडस, इत्यादी प्रकारचे सायबर गुन्हे सध्या समाजामध्ये घडत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिस विभागाकडील विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकी प्रसंगी या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. याबाबत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या सायबर कॉमिक बुकचे अनावरण पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याहस्ते झाले.

सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता करण्याकरीता ०१ जुलै २०२४ पासून सातारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने सातारा जिल्हयातील जिल्हा परिषद अंतर्गत व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरुकता वाढविण्याकरीता सायबर जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे.

यामध्ये सातारा जिल्हयातील सर्व शाळांमध्ये सायबर जागरुकता निर्माण करण्याकरीता सातारा जिल्हा पोलीस दलाकडून सायबर जागरुकतेसंबंधी सर्व सामग्री पुरविण्यात येणार आहे. यामध्ये इयत्ता ६ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांमध्ये सदरसामग्रीचा वापर करुन १ जुलै २०२४ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीमध्ये जिल्हयातील सर्व शाळांमध्ये सायबर जागरुकतेबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल व या परिक्षेमधून ज्या विद्यार्थ्यांना (१ मुलगा १ मुलगी) चांगले गुण मिळतील त्यांना त्याच शाळेचे सायबर अॅम्बेसीडर म्हणून निवडण्यात येईल व त्यांचे मनोबल वाढविणेकरीता ऑगस्ट २०२४ चे पहिल्या आठवडयामध्ये त्यांचा सत्कार घेण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचा उपयोग सायबर गुन्हयांना प्रतिबंध करण्याकरीता होणार आहे.

Previous Post

पुनर्वसनाची कामे गतीने आणि दर्जेदार करा – पालकमंत्री शंभुराज देसाई

Next Post

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ८ जून रोजी यलो अलर्ट, तर ९ ते ११ जूनदरम्यान ऑरेंज अलर्ट  

Related Posts

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…
मनोरंजन

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…

8 October 2026
बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…
आरोग्य

बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…

6 October 2026
धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!
महाराष्ट्र

धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!

6 October 2026
Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र

Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

4 October 2026
धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
Next Post
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ८ जून रोजी यलो अलर्ट, तर ९ ते ११ जूनदरम्यान ऑरेंज अलर्ट  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ८ जून रोजी यलो अलर्ट, तर ९ ते ११ जूनदरम्यान ऑरेंज अलर्ट  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.