MH 13 NEWS NETWORK
जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी पालीमकर यांच्या उपक्रमशीलतेला दिल्या शुभेच्छा
बीड,: जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त बीड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुहास पालीमकर यांनी मतदार जनजागृतीसाठी व्यंगचित्र प्रदर्शनाचे दालन उभारले. या त्यांच्या उपक्रमास जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुहास पालीमकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, चमन गार्डन येथील आठवडी बाजारपेठेत आज जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त स्वखर्चाने मतदार जनजागृतीसाठीचे व्यंगचित्र प्रदर्शन उभारले. या व्यंगचित्र प्रदर्शनीला बाजारपेठेतील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.
सुहास पालीमकर यांनी बीड लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृती करण्यासाठी व्यंगचित्र तयार करून दिले असून व्यंगचित्र बीड लोकसभा मतदारसंघातील मोक्याच्या ठिकाणी लावली आहेत. त्यांच्या या उपक्रमाशीलतेला जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.