मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पवित्र अशा रमजान महिन्यात उपवास, प्रार्थना व दानधर्माला महत्त्व दिले आहे. ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद उल फित्रच्या शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.