जयहिंद लोकचळवळच्या वतीने श्री संत गाडगेबाबा आश्रम शाळा, कवठे येथील प्रशालेत क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे जयहिंद लोकचळवळचे समन्वयक सुमित भोसले यांच्या वतीने प्रशस्ती पत्र व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेच्या उपाध्यक्षा- सौ.लक्ष्मी पाटील,संस्थेचे खजिनदार तथा जयहिंद लोकचळवळ सोलापूरचे-श्री.आदित्य पाटील, धर्मवीर प्रतिष्ठानचे श्री.हरिभाऊ सावंत तसेच जयहिंद लोकचळवळ सोलापूर चे श्री.अमोल कोटगोंडे( सचिव-युवाज्योत संघटना सोलापूर) यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेमहाराज यांची प्रतिमेचे पूजन संपन्न झाले.
1 जानेवारी 2024 रोजी प्रशालेत क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.यावेळी इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर विभाग अंतर्गत आयोजित क्रिडा स्पर्धेत प्रशालेचे तालुका स्तरीय 14 वर्षे मुले लंगडी विजते, 17 वर्षे मुले खो-खो विजते,19 वर्षे मुले खो- खो विजते तसेच वैयक्तिक स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र व शैक्षणिक साधन देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी जयहिंद लोकचळवळीचे सुमित भोसले यांनी भविष्यात गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.राठोड यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लिगाडे यांनी केले तर आभार श्री.कोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयहिंद लोकचळवळ चे अमोल कोटगोंडे व संस्थेचे खजिनदार आदित्य पाटील यांनी परिश्रम घेतले.