सुलोचना सिद्राम शिंदे,वय-86 यांचे आज दिनांक 3 जानेवारी बुधवार रोजी संध्याकाळी अल्पश: आजाराने निधन झाले.
गुरुवारी 4 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता निर्मिती लॉन्स मंगल कार्यालयाच्या बाजूला, निवारा नगर, सद्गुरू ग्लास च्या दुकानाचे वर, नडगिरी पेट्रोल पंपाचे समोर, विजापूर रोड सोलापूर येथील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
गुरुवारी सकाळी 10.30 वाजता मोदी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
त्या अध्यात्मिक, मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचे पश्चात 1 मुलगा, 2 मुली व 2 सुना, नातवंडे असा परिवार आहे.लाच लुचपत प्रतिबंधक खात्यातील कर्मचारी संजय शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.