पत्रकार सुरक्षा समिती मराठवाडा विभाग अध्यक्ष पदी बाळासाहेब शिंदे यांची नियुक्ती
सोलापूर / प्रतिनिधी – पत्रकार सुरक्षा समिती वतीने मराठवाडा विभाग अध्यक्षपदी बाळासाहेब शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात शिंदे यांना नियुक्तीचे पत्र देऊन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षापासून जेष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना, राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या सर्वच वृत्तपत्रांना पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती देण्यात याव्यात यासाठी संघटना कार्यरत आहे.
राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता मिळावी ,प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ,पत्रकारांसाठी विमा योजना ,आरोग्य योजना, अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती राज्यस्तरावर मागणी, निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहे.
पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देणे,खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी, पत्रकारांवर होणारे हल्ले, धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती आंदोलन उपोषण निवेदन त्याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत आहे. पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे.
पत्रकार सुरक्षा समिती मराठवाडा विभाग अध्यक्ष पदी बाळासाहेब शिंदे यांची नियुक्ती पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. सोलापूर येथे बाळासाहेब शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार ,माजी शहर अध्यक्ष राम हुंडारे, एन टीव्ही न्यूज चे आयुब शेख, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद आदी उपस्थित होते.