प्रजासत्ताकदिनच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३२ मान्यवरांना पद्म पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. महाराष्ट्राला ६ पद्मभूषण आणि ६ पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्रातील होर्मुसजी कामा (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता), अश्विन मेहता (वैधक), ज्येष्ठ नेते राम नाईक (सार्वजनिक सेवा), दिग्दर्शक राजदत्त आणि संगीतकार प्यारेलाल शर्मा (कला) तर कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता) यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर यांना सामाजिक, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे (खेळ), डॉ.मनोहर कृष्णा डोळे(वैद्यक), झहीर काझी (साहित्य आणि शि क्षण) , डॉ.चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (वैद्यक) , आणि कल्पना मोरपारिया(व्यापार) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
#PadmaAwards