सोलापूर शहरातील खंदक बागेतील हरळी प्लॉट सदस्यांनी आज सकाळी सात वाजता शहरातील पहिले राष्ट्रध्वजारोहण करून मानवंदना दिली.
प्रजासत्ताक दिनाचा उत्साह संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असताना
आज सकाळी सात वाजता, जवळपास 80 सदस्यांनी राष्ट्रध्वजारोहण करून अभिवादन केले.
हरळी प्लॉट योगासन मंडळात तीस वर्ष वयाच्या सदस्या पासून 86 वर्ष वयाचे सदस्य यांचा समावेश आहे. आजच्या दिवशी जेष्ठ नागरिक मंडळ खंडोबा सोलापूरचे सदस्य यांनी आपला सहभाग नोंदवला. विविध जाती-धर्मांना एकत्र बांधून ठेवून हरळी प्लॉट सदस्य एक आदर्श निर्माण करीत आहेत. अशी भावना सोलापूरकरांमध्ये व्यक्त होत असते.