Mh 13 News
मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील डॉ. ऋचा रुपनरकर या विवाहित महिलेचे आत्महत्याच प्रकरण घडून एक महिना होत नाही तोपर्यंतच सोलापूर जिल्ह्यातील आणखी एका विवाहित डॉक्टर महिलेन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी वय अंदाजे 38ते 40वर्ष या महिलेने आत्महत्या केली आहे. डॉक्टर जयश्री गवळी व त्यांचे पती डॉक्टर प्रशांत गवळी यांचे पेनुर येथे गवळी हॉस्पिटल या नावाने रुग्णालय आहे. त्यांना ३ अपत्य आहेत. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी पेनूर येथील राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन केले त्यानंतर त्यांना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान २:२० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पण डॉक्टर जयश्री गवळी यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही