Sunday, July 20, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र
0
मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

 लोकसभा निवडणूक २०२४

दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज

MH 13 NEWS NETWORK

२६ एप्रिल रोजी मतदान; १६ हजार ५८९ मतदान केंद्र

             मुंबई, : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मतदारांनी चांगला सहभाग नोंदवत मतदान केले असून निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात  मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दुसऱ्या टप्प्यातील 26 एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील  बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 लोकसभा मतदार संघामध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण 16,589 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 25 हजार 912 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये इटीपीबीएसद्वारे 18,471 सेवा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 12 डी अर्जाद्वारे 85 वर्षावरील व  दिव्यांग असे एकूण 14,612 मतदार मतदान करणार आहेत. या आठ मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) 37,403 तर कंट्रोल युनिट (सीयु) 16,589 आणि 16,589 व्हीव्हीपॅट उपलब्ध असून दुसऱ्या टप्प्यात एकूण 204 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या आठ लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघासाठी मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी आठही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.

ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी सुविधा

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मतदान प्रक्रियेसाठी मतदारसंघनिहाय जनरल निरिक्षक आठ पोलीस निरिक्षक पाच तर खर्च निरिक्षक अकरा नियुक्त करण्यात आले आहे.

प्रतिबंधात्मक कारवाई

कायदा व सुव्यवस्थांतर्गत 22 एप्रिलपर्यंत 49,134 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 1057 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 95,250 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

        राज्यामध्ये दि. 1 मार्च ते 22 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 43.96 कोटी एकूण रोख रक्कम तर 34.78 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 88.37 कोटी रुपये, ड्रग्ज 216.47 कोटी, फ्रिबीज 0.47 कोटी आणि इतर बाब अंतर्गत 87.84 कोटी रुपये अशा एकूण 471.89 कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

26,265 तक्रारी निकाली

16 मार्च ते 23 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 3,345 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 3,337 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच या कालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील 26,815 तक्रारीपैकी 26,265 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे 122 प्रमाणपत्र वितरित

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिद्धीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 122 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत.

          पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी :

अ.क्र.मतदार संघाचे नावपुरूष मतदारमतदान केलेले पुरूष मतदारमहिला मतदारमतदान केलेल्या महिला मतदारतृतीयपंथी मतदारमतदान केलेले तृतीयपंथी मतदारएकूण मतदार टक्केवारी
19- रामटेक10,44,891 6,66,302(63.77%) 10,04,142 5,83,556(58.11%) 526 (11.54%) 61.00% 
210 – नागपुर11,13,182 6,28,636(56.47%) 1109876 578680(52.14%) 223 28(12.56%) 54.30% 
311- भंडारा-गोंदिया9,09,570 6,26,275(68.85%) 9,17,604 598675(65.24%) 14 6(42.86%) 67.04% 
412-गडचिरोली -चिमुर8,14,763 5,95,281(73.06%) 8,02,434 5,67,147(70.68%) 10 5(50.00%) 71.88% 
513-चंद्रपुर9,45,736 6,58,448(69.62%)8,92,122 5,83,583(65.42%)48 11(22.92%)67.58%

 दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघातील मतदान प्रक्रियेच्या तयारीची माहिती खालीलप्रमाणे :

अ.क्र.मतदार संघाचे नावमतदान केंद्रेनिवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्याबॅलेट युनिट (बीयु)कंट्रोल युनिट(सीयु)व्हीव्हीपॅट
105 बुलढाणा1,962213,9241,9621,962
206 अकोला2,056152,0562,0562,056
307 अमरावती1,983375,9491,9831,983
408 वर्धा1,997243,9941,9971,997
514यवतमाळ-वाशिम2,225174,4502,2252,225
615 हिंगोली2,008336,0242,0082,008
716 नांदेड2,068234,1362,0682,068
817 परभणी2,290346,8702,2902,290
एकूण16,58920437,40316,58916,589

 दुसऱ्या टप्प्यातील मतदारांची संख्या

अ.क्र.मतदार संघाचे नावपुरुष मतदारमहिला मतदारतृतीयपंथी मतदारएकुणETPBS द्वारे मतदान करणारे सेवा मतदार85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12D अर्जांची संख्या.
105 बुलढाणा9,33,1738,49,5032417,82,7004,3952992
206 अकोला9,77,5009,13,2694518,90,8143,8432667
307 अमरावती9,44,2138,91,7808518,36,0782,6891236
408 वर्धा8,58,4398,24,3181416,82,7711,5211784
514 यवतमाळ-वाशिम10,02,4009,38,4526419,40,9161,545 1842
615 हिंगोली9,46,6748,71,0352518,17,7341,3481348
716 नांदेड9,55,0848,96,61714218,51,8431,689945
817 परभणी11,03,89110,19,1323321,23,0561,4411798
एकूण77,21,37472,04,1064321,49,25,91218,47114612

 मतदारांचा तुलनात्मक तपशील :-

अ.क्र.मतदार संघाचे नाव2014 मधील मतदार संख्या2019 मधील मतदार संख्या2024 मधील मतदार संख्या
105- बुलढाणा15,95,43517,62,91817,82,700
206 – अकोला16,72,64318,65,16918,90,814
307- अमरावती16,12,73918,33,09118,36,078
408- वर्धा15,64,55217,43,28316,82,771
514- यवतमाळ – वाशिम 17,55,292 19,16,18519,40,916
615 – हिंगोली15,86,19417,33,72918,17,734
716 -नांदेड16,87,05717,19,32218,51,843
817 -परभणी18,03,79219,85,22821,23,056

       तिसऱ्या टप्प्यातील अंतिम उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

क्रमांक व मतदारसंघअंतिम उमेदवारांची संख्या
32-रायगड13
35-बारामती38
40-धाराशीव (उस्मानाबाद)31
41-लातूर28
42-सोलापुर21
43-माढा32
44-सांगली20
45-सातारा16
46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग9
47-कोल्हापुर23
48-हातकणंगले27
एकूण258

तिसऱ्या टप्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या संख्येचा अंतिम तपशिल खालीलप्रमाणे :

अ.क्र.मतदार संघाचे नावपुरुष मतदारमहिला मतदारतृतीयपंथी मतदारएकुण85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12D अर्जांची संख्या.मतदान केंद्रे
132-रायगड8,20,6058,47,763416,68,3723,1462,185
235-बारामती12,41,94511,30,60711623,72,6684312,516
340-धाराशीव (उस्मानाबाद)10,52,0969,40,5608119,92,7374,5882,139
441-लातूर10,35,3769,41,6056119,77,0422,5662,125
542-सोलापुर10,41,4709,88,45019920,30,1192,0521,968
643-माढा10,35,6789,55,7067019,91,4542,3462,030
744-सांगली9,53,0249,15,02612418,68,1741,8591,830
845-सातारा9,59,0179,30,6477618,89,7401,2722,315
946-रत्नागिरी-सिंधुदुर्ग7,14,9457,36,6731214,51,630 3,726 1,942
1047-कोल्हापुर9,84,7349,51,5789119,36,4033,1032,156
1148-हातकणंगले9,25,8518,88,3319518,14,2771,1221,830
एकूण1,07,64,7411,02,26,9469292,09,92,61626,21123,036

               तिसऱ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.मतदार संघाचे नाव2014 मधील मतदार संख्या2019 मधील मतदार संख्या2024 मधील मतदार संख्या
132-रायगड15,32,78116,52,96516,68,372
235-बारामती18,13,55321,14,66323,72,668
340-धाराशीव(उस्मानाबाद)17,59,18618,89,74019,92,737
441-लातूर16,86,95718,86,65719,77,042
542-सोलापुर17,02,73918,51,65420,30,119
643-माढा17,27,32219,09,57419,91,454
744-सांगली16,49,10718,09,10918,68,174
845-सातारा17,19,99818,48,48918,89,740
946-रत्नागिरी-सिंधुदुर्ग13,67,36214,55,57714,51,630
1047-कोल्हापुर17,58,29318,80,49619,36,403
1148-हातकणंगले16,30,60417,76,55518,14,277

 चौथ्या टप्प्यात 01 नंदुरबार, 03 जळगाव, 04 रावेर, 18 जालना, 19 औरंगाबाद, 33 मावळ, 34 पुणे, 36 शिरूर, 37 अहमदनगर, 38 शिर्डी, 39 बीड अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरुदिनांक 18.04.2024
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांकदिनांक 25.04.2024
नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनांकदिनांक 26.04.2024
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांकदिनांक 29.04.2024
मतदानाचा दिवसदिनांक 13.05.2024

        चौथ्या टप्प्यात दि.23 एप्रिल 2024 पर्यंत खालीलप्रमाणे उमेदवार व त्यांची नामनिर्देशने प्राप्त झालेली आहेत.

अ.क्र.मतदार संघाचे नावउमेदवारांची  संख्यानामनिर्देशनाची संख्या
101 नंदुरबार0408
203 जळगाव0405
304 रावेर0610
418 जालना1116
519 औरंगाबाद2127
633 मावळ1016
734 पुणे1619
836 शिरूर1017
937 अहमदनगर1012
1038 शिर्डी0608
1139 बीड1315
 एकूण111153

Previous Post

मालवणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

अखेरीस सोनिटिक्स क्रिप्टोकरन्सी चालक वकिलास अटक ,एक कोटीची फसवणूक | पुणे सायबर पोलिसांची कामगिरी

Related Posts

जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकटीसाठी खा. तटकरे यांचा महाराष्ट्र दौरा; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
महाराष्ट्र

जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकटीसाठी खा. तटकरे यांचा महाराष्ट्र दौरा; कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

20 July 2025
डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याप्ती वाढली : निलेश झालटे
महाराष्ट्र

डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याप्ती वाढली : निलेश झालटे

20 July 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

20 July 2025
‘रायगडवाडी’ एक ऐतिहासिक निर्णय : पालकमंत्री गोरे यांचा आमदार कोठे, धुत्तरगांवकर, सहकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
धार्मिक

‘रायगडवाडी’ एक ऐतिहासिक निर्णय : पालकमंत्री गोरे यांचा आमदार कोठे, धुत्तरगांवकर, सहकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

19 July 2025
सोलापूरच्या ‘या’ डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!
आरोग्य

सोलापूरच्या ‘या’ डॉक्टर्सचं ‘स्मार्ट’ जॅकेट आता पेटंटधारक!

18 July 2025
पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू; वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली
गुन्हेगारी जगात

पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू; वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली

18 July 2025
Next Post

अखेरीस सोनिटिक्स क्रिप्टोकरन्सी चालक वकिलास अटक ,एक कोटीची फसवणूक | पुणे सायबर पोलिसांची कामगिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.