रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मध्ये ३२ रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे उमेदवार सुनील तटकरे 82 हजार 784 मतांनी विजयी झाले. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनंत गीते यांना पराभूत करून विजय मिळवला. जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली ता. अलिबाग येथील मतमोजणी केंद्रावर आज सकाळी 8 वाजता प्रत्यक्षात मतमोजणी सुरु झाली, 29 फेर्यांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.
लोकसभा निवडणुकीत मतमोजणी झालेल्या एकूण 10 लाख 13 हजार 272 मतांपैकी उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत.
1) श्री.अनंत गंगाराम गिते, (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 425568 मते
2)श्री.सुनिल दत्तात्रेय तटकरे, (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) – 508352 मते
3) श्रीमती कुमोदिनी रविंद्र चव्हाण, (वंचित बहुजन आघाडी) – 19618 मते
4) श्री. श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती, (अपक्ष) – 9394 मते
5) श्री.अमित श्रीपाल कवाडे,(अपक्ष) – 5634 मते
6) श्री.अनंत बाळोजी गिते (अपक्ष) – 3515 मते
7) श्री.नितीन जगन्नाथ मयेकर, (अपक्ष) – 2560 मते
8) श्री.पांडुरंग दामोदर चौले, (अपक्ष) – 2417 मते
9) श्री.अनंत पद्मा गिते (अपक्ष) – 2040 मते
10) श्री.प्रकाश बाळकृष्ण चव्हाण, (भारतीय जवान किसान पार्टी) – 1939 मते
11) श्री. मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष) – 1820 मते
12) श्री.अजय यशवंत उपाध्ये, (अपक्ष) – 1795 मते
13)श्रीमती अंजली अश्विन केळकर,(अपक्ष) – 1350 मते
14) नोटा – 27 हजार 270 मते.