4250 मतदारांनी केला नोटाचा वापर
7953 मतदारांनी केले टपाल मतपत्रिकेतून मतदान
धाराशिव (माध्यम कक्ष) 40 -उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज 4 जून रोजी सकाळी 8 वाजतापासून शासकीय तंत्रनिकेतन, धाराशिव येथे सुरुवात झाली.एकूण 30 फेरीनंतर निकाल घोषित करण्यात आला. या निवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर हे 3 लक्ष 29 हजार 846 एवढ्या मताधिकक्याने विजयी झाले. श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या उमेदवार सौ अर्चना पाटील यांचा पराभव केला.श्री.राजेनिंबाळकर या 7 लक्ष 48 हजार 752 मते पडली.
निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या 31 उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे. सौ.अर्चना राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)(4 लक्ष 18 हजार 906),ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (7 लक्ष 48 हजार 752),संजयकुमार भागवत वाघमारे,बहुजन समाज पार्टी (5 हजार 615),आर्यनराजे किसनराव शिंदे, राष्ट्रीय समाज दल (आर) (1887),भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर,वंचित बहुजन आघाडी (33 हजार 402),नेताजी नागनाथ गोरे,देश जनहित पार्टी (2 हजार 336), नवनाथ विश्वनाथ दुधाळ,विश्व शक्ती पार्टी (1 हजार 135),नितेश शिवाजी पवार,हिंदराष्ट्र संघ (1 हजार 79),ॲड. विश्वजीत विजयकुमार शिंदे, आदर्श संग्राम पार्टी (865),शामराव हरीभाऊ पवार, समनक जनता पार्टी (1509),शेख नौशाद इकबाल,स्वराज्य शक्ती सेना (1686), सिध्दीक इब्राहीम बौडीवाले उर्फ गोलाभाई, ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (2060),ज्ञानेश्वर नागनाथ कोळी,समता पार्टी (6472), अर्जुन (दादा) सलगर,अपक्ष ( 1935), उमाजी पांडूरंग गायकवाड,अपक्ष (3095),काका फुलचंद कांबळे, अपक्ष(4811),काकासाहेब संदिपान खोत,अपक्ष (5715),गोवर्धन सुब्राव निंबाळकर,अपक्ष (18966), नवनाथ दशरथ उपळेकर,अपक्ष (2108), नितीन नागनाथ गायकवाड,अपक्ष (731), ॲड.भाऊसाहेब अनिल बेलुरे,अपक्ष (677),नितीन खंडू भोरे,अपक्ष (1204) मनोहर आनंदराव पाटील,अपक्ष (1190), योगीराज आनंता तांबे,अपक्ष (1336), राजकुमार साहेबराव पाटील,अपक्ष (593),राम हनुमंत शेंडगे,अपक्ष (3263),विलास भागवत घाडगे,अपक्ष (610),शायनी नवनाथ जाधव,अपक्ष (782),समीरसिंह रमेशचंद्र साळवी,अपक्ष (594), सोमनाथ नानासाहेब कांबळे- अपक्ष (1268), हनुमंत लक्ष्मण बोंदर, अपक्ष (2172) आणि नोटा (4298)असे मतदान झाले.एकूण 12 लक्ष 81 हजार 52 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये टपाल मतपत्रिकेच्या 7953 मतांचा समावेश आहे.
निवडणूकीत विजयी झालेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी विजयी झाल्याबद्दल भारत निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र दिले.