MH 13 NEWS NETWORK
मुंबई, दि. 8 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 करिता मुंबई उपनगर जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांची सर्वसाधारण केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त केली आहे. हे निवडणूक निरीक्षक जिल्ह्यातील चारही मतदारसंघात दाखल झाले असून त्यांनी निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेत विविध ठिकाणी भेटी देण्यास सुरुवात केली .
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी धनंजय सिंग भदोरिया सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक
26 – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी धनंजय सिंग भदोरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 9321887963 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-26435480 असा आहे. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, कक्ष क्रमांक 304, तिसरा मजला, इंडियन ऑईल विश्रामगृह, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई -400051 असा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. वेळ – दुपारी 1 ते 2 वा. ठिकाण – निवडणूक निर्णय अधिकारी, 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ, अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) पश्चिम उपनगरे यांचे कार्यालय, 7 वा मजला, प्रशासकीय इमारत, शासकीय इमारत, वांद्रे पूर्व, मुंबई-400051.
मुंबई उत्तर–पश्चिम मतदारसंघासाठी संजय कुमार खत्री सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक
27– मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी संजय कुमार खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 9372753013 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-25720610 असा आहे. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, कक्ष क्रमांक 1002, दहावा मजला, पद्मविहार विश्रामगृह, आयआयटी, पवई, मुंबई -400076 असा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. वेळ– सायंकाळी 4 ते 5 वा. ठिकाण – कक्ष क्रमांक 1002, दहावा मजला, पद्मविहार विश्रामगृह, आयआयटी, पवई, मुंबई -400076.
मुंबई उत्तर–पश्चिम मतदारसंघासाठी स्तुती चारण सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक
28– मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी स्तुती चारण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 8591366725 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-20851459 असा आहे. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, कक्ष क्रमांक 03, पहिला मजला, आर्क विश्रामगृह, आर.सी. एफ., चेंबूर, मुंबई -400074 असा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. वेळ– दुपारी 12 ते 1 वा. ठिकाण – निवडणूक निर्णय अधिकारी, 28 – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ, पिरोजशा नगर, सांस्कृतिक सभागृह, स्टेशन साईड कॉलनी, गोदरेज कॉलनी, विक्रोळी स्टेशन जवळ, विक्रोळी (पूर्व), मुंबई – 400079.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी परवीन कुमार थिंड सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक
29– मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी परवीन कुमार थिंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 8928571253 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-45006422 असा आहे. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, कक्ष क्रमांक 305, तिसरा मजला, इंडियन ऑईल विश्रामगृह, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई -400051 असा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. वेळ– दुपारी 1 ते 3 वा. ठिकाण – निवडणूक निर्णय अधिकारी, 29 – मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, जिल्हाधिकारी आणि सक्षम प्राधिकारी (ना. क्षे. क.) यांचे कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय इमारत, शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व, मुंबई – 400051.