Sunday, October 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या समस्या सोडविणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या समस्या सोडविणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

चंद्रपूर, दि. 27 : वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर अभ्यासक्रमासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णसेवाही देत असतात. अशावेळी या डॉक्टरांना चांगली वागणूक मिळावी आणि त्यांच्या हातून चांगली सेवा घडावी, याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे येथील निवासी डॉक्टरांच्या मूलभूत समस्या त्वरित सोडविण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सर्वोत्कृष्ट करण्यासाठी भविष्यात चंद्रपुरात नर्सिंग, डेंटल आणि पॅरामेडिकल कॉलेज आणणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या समस्यांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रणय गांधी, निवासी डॉक्टर संघटनेचे (मार्ड) डॉ. अक्षय वाघमारे, डॉ. पल्लवी रेड्डी, डॉ. प्रशांत मकदूम आदी उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयात लवकरच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडून सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी आपण व्यक्तिश: लक्ष देऊ, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, 175 सुरक्षा रक्षकांचे 1 कोटी 44 लक्ष 51 हजार 439 रुपये 30 मे 2024 रोजी महाराष्ट्र सुरक्षा मंडळाला देण्यात आले आहे. उर्वरीत रक्कम सुरक्षा मंडळाला त्वरित देण्यात येईल. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीकरीता 450 सुरक्षा रक्षकांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकांचा निधी राज्य शासनाने थेट महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे देण्याबाबतचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण मांडणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालयात एका रुग्णासोबत एक नातेवाईक असा नियम आहे. याबाबत रुग्णालयाकडून पास सुध्दा वितरीत करण्यात येते मात्र ब-याचवेळी नातेवाईक रुग्णालयात गर्दी करतात. नातेवाईकांमध्ये एखादा व्यक्ती जर दारु पिऊन असेल तर त्याची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्यासाठी 33 कोटी 65 लक्ष रुपयांचा फर्निचरचा प्रस्ताव आणि 42 कोटी 79 लक्ष रुपयांचा अत्याधुनिक साधनसामुग्रीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नवीन इमारतीमध्ये चांगल्या कंपनीचे फर्निचर लावा.

निधीची वाट बघणार नाही : विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. सामान्य रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, त्यांची स्वच्छता व शुध्दीकरण व इतर मुलभूत सुविधांसाठी शासनाच्या निधीची वाट न पाहता जिल्हा नियोजन समिती आणि खनिज विकास निधीतून पैसे उपलब्ध करून दिले जातील, असा विश्वास देत येथील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. महिला रुग्णालय त्वरीत सुरू करण्याचे तसेच नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्गावरील अतिक्रमण काढण्याचे निर्देशही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

Previous Post

विधानपरिषदेत सभापती तालिका नामनिर्देशित

Next Post

विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

Related Posts

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
Next Post
विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.