MH 13News Network
श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाज बहुउद्देशीय मंडळ बाळे, येथे शिवजयंतीनिमित्त शिवमूर्तीची प्रतिष्ठापना व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, प्रा. गणेश देशमुख यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन, रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाज बहुउद्देश मंडळ बाळे यांनी आज रविवारी सकाळी
रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
आज रविवारी सकाळी अंबिका नगर या ठिकाणी शिवछत्रपती मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, प्रा. गणेश देशमुख, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सोमनाथ राऊत, मंडळाचे मार्गदर्शक गोपाळ दळवी,मंडळाचे अध्यक्ष प्रमोद सावंत, कार्याध्यक्ष प्रभाकर शिंदे, उपाध्यक्ष संतोष जाधव, उपाध्यक्ष सतीश शिंदे, सचिव यशवंत लोंढे, सहसचिव चंद्रकांत शिंदे, खजिनदार विशाल पाटील, प्रसिद्ध प्रमुख विपुल लावंड, गणेश सरवळे, सुनील सुरवसे, धर्मराज भोसले, तुळशीदास शिंदे, चेतन माने, किरण काळे, संतोष करंडे, विवेक काजळे,मुकेश जाधव, आबा शिंदे,अमोल सावंत,मंगेश घुले,प्रताप कादे, गोरख ठाकर,परमेश्वर आबा सावंत,किरण नलवडे, नीता धनाजी गवळी, मनीषा डोईफोडे व परिसरातील शिवभक्त उपस्थित होते.
19 फेब्रुवारी रोजी सकाळी बाळे भागात 10 वा.पाळणा सोहळा व पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. शिवरायांची पालखी ही बाळे भागातील प्रमुख मार्गावरून जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाळणा सोहळ्यासाठी महिला भगिनींचा समावेश मोठ्या प्रमाणावर असून सर्व शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी केले आहे.