MH 13 NEWS NETWORK
दहावी बोर्ड परीक्षेत दमाणी प्रशालेची 100% निकालाची परंपरा कायम
सारंग पवार 98.80% टक्के गुणांसह प्रशालेतून प्रथम
मार्च -2024 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत बी.एफ. दमाणी प्रशालेच्या विदयार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत 100% निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम राखली. एकूण 119 पैकी 98 विदयार्थी विशेष योग्यता तर 17 विदयार्थी प्रथम श्रेणीत व 4 विदयार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
प्रशालेच्या 51 विदयार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले तर 9 विदयाथ्यांना संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले. प्रशालेतील प्रथम 3 विदयार्थी पुढीलप्रमाणे
प्रथम – चि. पवार सारंग संतोष
98.80%
व्दितीय – चि. जाधव तन्मथ बाळासाहेब
98.60%
व्दितीय – चि. खोत अथर्व राजेंद्र
98.60%
तृतीय- चि. पाटील श्लोक शिवानंद
97.40%
तृतीय – कु. तोडकर श्रेया लक्ष्माण
97.40%
माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणेचे उपाध्यक्ष मा. श्री. गिरीधारीजी भुतडा, संस्थेचे स्थानिय अध्यक्ष मा.श्री. नंदकिशोरजी भराडिया, सचिव मा.श्री. कालीदासजी जाजू सहसचिव मां.श्री. उज्वलजी तापडिया व संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. रेखा पेंबर्ती, पर्यवेक्षक मा.श्री. राहुल इंगळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी संर्व यशस्वी विदयार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
फोटोमध्ये उभे असलेले – तन्मय जाधव, सारंग पवार, अथर्व खोत, श्लोक पाटील, श्रेया तोडकर