MH 13 News
धूत मेगा साडी महोत्सवात खरेदी करा आणि मिळवा ६० टक्क्यांपर्यंत सूट
प्रत्येक खरेदीवर मिळणार आकर्षक बक्षिसे : अँड्रॉइड मोबाईलचाही समावेश
सोलापूर : प्रतिनिधी
‘महाराष्ट्राचे वस्त्र वैभव’ अशी ख्याती असलेल्या धूत मेगा साडी महोत्सवात साड्या खरेदी करुन तब्बल ६० टक्क्यांपर्यंत सूट मिळवता येणार आहे. ग्राहकांना प्रतीक्षा लागून राहिलेला धूत सारीज् चा धूत मेगा साडी महोत्सव ११ जूनपासून सुरू होणार आहे, अशी माहिती धूत सारीज् चे पुरुषोत्तम धूत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
बाळीवेस येथील कावळे मेडिकलच्या बोळात असलेल्या धूत सारीज् च्या आवारात मंगळवारी (दि. ११) सायंकाळी ५.३० वाजता निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
याप्रसंगी इंडियन मॉडेल स्कूलच्या संचालिका सायली जोशी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सामाजिक कार्यकर्त्या अनिता चव्हाण, शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवा रंजीता चाकोते, जैन संगिनी सेंट्रलच्या अध्यक्ष प्रीती शहा, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा वरेरकर चिटणीस, गुजराती महिला मंडळाच्या अध्यक्षा पारुल पटेल, श्री सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाच्या अध्यक्षा सुरेखा मेंगजी, यशस्विनी ऍग्रो प्रोड्यूसर कं. लि. च्या चेअरमन अनिता माळगे, स्टाईल मंत्रा सलून अँड अकॅडमीच्या संस्थापिका सोनल पांचाल, आर.जे. श्रद्धा कामत – पटेल, आर.जे. पल्लवी गंभीरे – नाईक, आर. जे. आकांक्षा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यंदाच्याही धूत मेगा साडी महोत्सवात मुगा सिल्क, मैसूर सिल्क, बनारसी, धर्मावरम, मदुराई, बेंगलोरी, दिंडीगल, बांधणी, कसवू, कांजीवरम, कलमकारी, कांता, पोचमपल्ली, टसर सिल्क अशा शेकडो प्रकारच्या साड्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
सोलापूरच्या बाजारपेठेत लग्नाचा बस्ता म्हणजे धूत साडी असे समीकरणच जणू तयार झाले आहे. त्यामुळे सोलापूर शहर – जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा राज्यातील नागरिकांकडून लग्नाच्या बस्त्यासाठी धूत सारीज् चीच निवड केली जाते.
दरवर्षीप्रमाणे धूत मेगा साडी महोत्सवात साड्या खरेदीवर आकर्षक बक्षिसांची लय लूट केली जाणार आहे. यात सेलो हॉट क्लासिक, हॉट पॉट, ट्रॉली बॅग, वेलवेट गालीचा, वेडिंग मिंक सेट तसेच अँड्रॉइड मोबाइल अशा बक्षीसांचा समावेश आहे.
वाजवी दरात अत्यंत चांगल्या दर्जाच्या आणि संपूर्ण भारतभरात मिळणाऱ्या साड्या एकाच छताखाली उपलब्ध होत असल्यामुळे महिला भगिनी साडी खरेदीसाठी धूत साडी महोत्सवालाच प्राधान्य देतात.
या पत्रकार परिषदेस नंदकिशोर धूत, अनिल शाबादी उपस्थित होते.
–
म्हणूनच मिळतात उत्तम दर्जाच्या साड्या वाजवी किंमतीत..
धूत सारीज् कडून साडी कारखानदारांना रेशीम पुरवून साड्या तयार करून घेण्यात येतात. तसेच धूत सारीजकडे अतिशय कल्पक आणि आकर्षक नक्षीकाम करणारे डिझायनर आहेत. त्यामुळे धूत सारीजमध्ये अतिशय स्वस्त दरात ग्राहकांना अत्यंत चांगल्या दर्जाच्या आणि नक्षीकामाच्या साड्या योग्य किमतीत उपलब्ध होतात.