मुंबई : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा- २०२१ या परीक्षेतील पोलीस उप निरीक्षक संवर्गाच्या एकूण ३७८ पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे. ही यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो, असे आयोगाने कळविले आहे.