शेखर म्हेत्रे /माढा प्रतिनिधी : माढा तालुक्यातील मानेगाव येथे गुरुवार 2 नोव्हेंबर मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी गेल्या नऊ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात आमरण उपोषणाला बसुन आपल्या जीवाची बाजी लावत मराठा समाजासाठी सरसकट कुणबी आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर ठिक ठिकाणी आंदोलन व उपोषण करून त्यांच्या तब्येतीची काळजी व्यक्त करत मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे.
गुरुवारी सकाळ पासून मानेगाव येथे सकल मराठा समाज व इतर समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला गावातील स्थानिक पातळीवरील नेते मंडळींनी पाठिंबा दिला आहे.
या आधी मानेगावात राजकीय नेत्यांना गावबंदी ही करण्यात आली आहे.या आंदोलना मोठा पाठिंबा मिळत आहे असुन गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या व हे साखळी उपोषण मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळेपर्यंत चालू ठेवणार असल्याचे सांगितले.