शेखर म्हेत्रे /माढा प्रतिनिधी : मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण करून धारेवर धरले असून राज्यभर ठिक ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन व उपोषण करून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. मंगळवारी सकल मराठा समाजाच्या वतीने माढा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात सहभागी असलेल्या प्रत्येकाने डोक्यावर भगवी टोपी परिधान केली असल्याने हा परिसर भगवामय झाला होता.
मनोज जरांगे पाटील यांन्या समर्थनार्थ माढा तालुक्यामध्ये गेल्या पाच दिवसांपासून ठिकठिकाणी साखी उपोषण, कॅन्डल मार्च व अर्धसमाधी आदोलन, राजकीय नेत्यांना गावबंदी, राजकीय पदाचे राजीनामा यासह माढा व परिसरातील गावात मराठा समाजाच्या महिलांनी साखळी उपोषण करण्यास सुरवात केली आहे.या सर्व आंदोलना मोठा पाठिंबा मिळत आहे.
सकल मराठा समाजाने मंगळवारी माढ्यातील वैराग रस्त्यावरुन मोर्चा सुरू केले होता. या मोर्चा मध्ये माढा शहरासह तालुक्यातील सर्व पक्षीय नेतेमंडळी, विद्यार्थी व सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांना व या आंदोलनाला माढा वकील संघाने पाठींबा असल्याचे वकील संघाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी सांगितले आहे.तसेच आंदोलन दरम्यान मराठा समाजावर काही खटले दाखल झाल्यास ते न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मोफत लढविण्याचा निर्णय माढा वकील संघाच्यावतीने घेण्यात आला
असल्याचे ही सांगितले आहे.यावेळी हलगी नाद करुन
जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या माढा तहसील कार्यालयावर मोर्चा जाताच विद्यार्थ्यांच्या हस्ते माढा तहसीलदार विनोद रणवरे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
