भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली*. ब्राह्मण सेवा संघामध्ये भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ब्राह्मण समाजातील सर्व राजकीय, सामाजिक,वैद्यकीय ,शैक्षणिक ,सांस्कृतिक सर्व क्षेत्रातले मान्यवर व महिला वर्ग उपस्थित होता.या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी सामाजिक व बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा सौ संपदा जोशी यांनी केला होता. यावेळी संस्थेचे पदाधिकारी आरती काशीकर,अर्चना कांबळे, आरती खेडकर, पद्मजा जोशी, उषा काळे, व ब्राह्मण समाजाचे मान्यवर डीडी कुलकर्णी, रामभाऊ तडवळकर, बजरंग कुलकर्णी, संतोष दिवाण, विक्रम ढोनसळे, रमण कुलकर्णी,अमृता गोसावी, निशिकांत खेडकर, दत्ता आराध्ये, ऋषिकेश कुलकर्णी, रोहित तडवळकर, द्वैदीप्य वडापूरकर, प्रशांत कुलकर्णी, रवी हलगीकर, नितीन कुलकर्णी असे अनेक मान्यवर उपस्थित होते. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचे कार्य कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम आमची संस्था करीत असून त्यांच्या नावाने विविध सामाजिक उपक्रम आमची संस्था राबवीत आहे.. सौ संपदा जोशी. संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी सामाजिक व बहुउद्देशीय संस्था