MH 13News Network
आज गुरुवारी काँग्रेस भवन येथून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणाऱ्या सभेनंतर काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बळीराम काका साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
42-सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघासाठी कु. प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज गुरुवारी सकाळी काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचंड घोषणाबाजी नंतर जाहीर सभा घेण्यात आली .त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली निघाली. त्यामध्ये हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
भर उन्हात निघालेल्या रॅलीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.