MH 13 news network
2023-24 या आर्थिक वर्षात सोलापूर रेल्वे विभागात, विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरडी) श्री. अनुभव वार्ष्णेय यांच्या देखरेखीखाली टीआरडी विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रेल्वे मध्ये TRD एक असा विभाग आहे ज्या मध्ये विद्युत (इलेक्ट्रिक) रेल्वे गाडीचे संचालन करतांना OHE (ओव्हर हेड इलेक्ट्रिक) विद्युत तारेचे देखभाल, नवीन लाईन ला इलेक्ट्रिफाय करण्यासाठी OHE तार लावणे ,लोको पायलटला प्रशिक्षण देणे, त्यांच्या ड्युटी आणि समस्या सोडवणे आदी महत्वपूर्ण कामांचा समावेश होतो .
TRD विभागाची कामगिरी…
2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 158.67 ट्रॅक किलोमीटर चे विद्युतीकरण पूर्ण झाले.
(बेलापूर – पढेगाव, सिरोला – अकोळनेर, वळद – भिवंडी, अहमदनगर – न्यू आष्टी , निंबालक -विलाद -वांबोरी)
2023-24 या आर्थिक वर्षात सोलापूर आणि कलबुर्गी येथे दोन पिट लाईनचे विद्युतीकरण करण्यात आले.
2023-24 या आर्थिक वर्षात 7 रेल्वे स्थानकावर बॅलास्ट साइडिंग मधील OHE वायरिंगचा विस्तार पूर्ण झाला.
मिरज-कुर्डूवाडी-लातूर विभागात एसी ट्रॅक्शन सुलभ करण्यासाठी 2023-2024 मध्ये SGRE/TSS आणि KMRD/ TSS चे कमिशनिंग करण्यात आले.
सोलापूर विभागामध्ये विद्युती करणामुळे, चालू वर्षात एचएसडी ऑइलचे इश्यू 17,266 KL (रु. 159 कोटी) ने कमी झाले आहे.
गृह प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून 70% क्रूने WAG 12B लोकोमोटिव्ह लेखी आणि प्रात्यक्षिक अश्या दोन्ही प्रकारचे प्रशिक्षण दिले. आणि 75% क्रूने AC-DC लोको प्रशिक्षण दिले.
RS फ्लॅप व्हॉल्व्ह प्रात्यक्षिक प्रणाली ALP साठी सर्व लॉबीमध्ये प्रदान केली गेली . जेणेकरुन पिवळ्या बाजूने सिग्नल पास करताना त्यांचा हात आपत्कालीन ब्रेक व्हॉल्व्हवर ठेवता येईल