नाशिक | २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पंतप्रधान Narendra Modi यांचे निलगिरी बाग येथील हेलिपॅडवर आगमन झाले. मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधानांचे स्वागत केले.
तत्पूर्वी पंतप्रधानांचे नवी दिल्ली येथून वायुदलाच्या विशेष विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले. मुख्य सचिव डॉ. नितीन करीर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.