MH 13 NEWS NETWORK
सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर लोकसभेतर्फे संकल्पपत्राचे प्रकाशन उद्या शनिवारी (दि. ४) दुपारी १२.३० वाजता शांतीसागर मंगल कार्यालयात होणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे.
भाजपाच्यावतीने आगामी काळात होणारी विकासकामे, राबविण्यात येणाऱ्या योजना आदींबाबतची माहिती या संकल्पपत्रात देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीने केले आहे.