सोलापूर – सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.आज दिवाळीच्या भाऊबीजेदिवशी एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली.
स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केलेल्या कॉन्स्टेबलचे नाव राहुल शिरसाट असे आहे. ते पोलीस मुख्यालय येथे नेमणुकीस होते.
अज्ञात कारणावरून स्वतःवर गोळी झाडून पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केली आहे.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आत्महत्याचे कारण अद्याप समजले नसून अधिक तपास पोलीस करत आहे.
धक्कादायक बाब समोर आली असून भाऊबीजेच्या दिवशी स्वतःवर गोळी झाडून ज्या पोलीस कॉन्स्टेबल शिरसाट यांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबात वडील, भाऊ, बहीण, पत्नी सगळेच पोलिस खात्यात सेवेस आहेत.
आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची पत्नी देखील पोलीस आहे. भाऊ देखील पोलीस दलात आहे.बहीण देखील वरिष्ठ पदावर आहेत. व वडील काही वर्षांपूर्वी एसआय म्हणून रिटायर्ड झालेले आहेत.
आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.