MH 13 NEWS NETWORK
शहरातील विविध भागात राहणाऱ्या वडार समाजातील प्रमुख, पंच, माजी नगरसेवक , प्रतिष्ठित बांधवांकडून घोषणा
वडार समाज हा परंपरागत काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभा असलेला समाज असून काँग्रेसने देखील यापूर्वी १७ नगरसेवक देऊन वडार समाजाला न्याय दिला आहे. आजदेखील हा समाज भक्कमपणे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहणार असून भविष्यात देखील काँग्रेस पक्षाच्याच पाठीशी उभा राहील अश्या प्रकारची घोषणा आज सोलापूर शहरातील विविध भागात राहत असणाऱ्या आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रमुख, माजी नगरसेवक, समाजातील पंच, विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, प्रतिष्ठित मान्यवरांनी आज एकत्र येऊन काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार मा. प्रणितीताई शिंदे याना जाहीर पाठिंबा दिला .
देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने 2024 ची लोकसभेची निवडणूक खूप महत्त्वाची असून, हा देश लोकशाही पद्धतीने काम करेल की हुकूमशाही पद्धतीने हे या निवडणुकीनंतर ठरणार आहे. स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारी जिल्ह्यातील जनता ही यंदा लोकशाही ला मानणाऱ्या लोकांच्या पाठीमागे राहणार आहे. सहा वर्षांपूर्वी वडार समाजाच्या मेळाव्यात राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडार समाजाच्या विविध मागण्या संदर्भात काम करू असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात समाजाच्या पदरी निराशा आली .सोलापूर जिल्ह्यात वडार समाज बांधवांच्या न्याय व हक्कासाठी काम करणाऱ्या संघटना आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार, काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आमदार प्रणिती शिंदे यांनी आजवर वडार समाज बांधवांच्या न्याय व हक्काच्या मागण्यांचा पाठपुरावा केला आहे. शासन दरबारी या मागण्या मांडले आहेत. समाज बांधवांचे दगड खाणींचे विषय असो रॉयल्टी चे विषय असो. यातील शासन दरबारी निर्माण करण्यात आलेल्या अडचणी दूर करण्याचे काम आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातूनच झाले आहे. त्यामुळे आम्ही समस्त समाज बांधवांनी आमदार प्रणिती ताई शिंदे यांचा सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावू अशा आश्वासन दिले होते. भाजपाचे सरकार देशातील आरक्षण रद्द करण्याच्या डाव रचत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. भाजप सोबत जाऊन समाजाची घोर फसवणूक होणार आहे. समाजातील तळागाळात काम करणाऱ्या तरुण तरुणींचे शिक्षणाचे, आरोग्याचे, उच्च शिक्षणाचे, आरक्षणाचे प्रश्न असेच प्रलंबित राहणार आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून होईल असा आमचा ठाम विश्वास आहे. सदर बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रदेश प्रतिनिधी CA सुशील बंदपटे, माजी नगरसेवक दत्तू अण्णा बंदपट्टे, माजी नगरसेविका महादेवी अलकुंटे, मनोहर मुधोळकर, विष्णू मुधोळकर, डॅडी दुरलेकर, गजेंद्र निंबाळकर, भारत निंबाळकर, गोपी मुदगल, परशुराम आनंदकर, सिद्धू आनंदकर, ताम्मा भरले, भीमराव धोत्रे, राजाभाऊ कलकेरी, सुरेश धोत्रे महाराज, अशोक यामपुरे, रवी अलकुंटे, दत्ता विटकर, प्रदीप भरले, हेमंत कुमार निंबोळे, अंजलीताई मंगोडेकर, अविराज आनंदकर, मोहन विटकर, राजू लिंबोले , राजू चौगुले , महेश अलकुंटे, श्रीनिवास यमपुरे, बंटी यमपुरे, सुशील कन्नूरे, सुशील कंदलगावकर , संजय यमपुरे, गोपाळ पाथरुट, सदाशिव मुद्दे, पुनाजी भांडेकर, भीमाशंकर बंदपट्टे, संतोष इरकल बंटी पवार, दत्तू अलकुंटे.